एज्युकेशन जॉब्स

Good News - आता दाखल्याशिवाय मिळणार शाळेत प्रवेश

शिक्षण विभागाचे आदेश; पालकांना दिलासा

राजेश कळंबटे

रत्नागिरी : एका शाळेतून (school admission) दुसर्‍या शाळेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो; मात्र आता विद्यार्थ्यांना दाखल्याशिवाय प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश जारी केले आहेत. कोरोना (corona) काळात बंद पडलेले व्यवसाय आणि बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक पालकांना विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क भरता आलेले नाही. अनेक शाळा विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नाकारत आहेत.

शाळेचा दाखला नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दुसर्‍या शाळेत प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक (educational) नुकसान होते. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. आरटीईच्या (RTE) चालू वर्षीच्या रिक्त जागेसाठी होणारी पालकांची कसरत संपली आहे. आरटीईच्या नियमानुसार सर्व विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्‍या शाळेत प्रवेश घ्यायचा हक्क असतो. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोणत्याही शासकीय, महापालिका, नगरपालिका किंवा खासगी अनुदानित माध्यमिक शाळेत नववी किंवा दहावीत अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना टीसीअभावी प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असा निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच पूर्वीच्या शाळेतून ट्रान्सफर सर्टिफिकेट (transfer certificate) प्राप्त न झाल्यास संबंधित शाळेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याला वयानुसार वर्गात प्रवेश दिला जावा. यासाठी जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. यामुळे कोणताही विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊन तो शाळाबाह्य होणार नाही, असेही त्यात नमूद केले आहेत. ज्या शैक्षणिक संस्था किंवा शाळा विद्यार्थ्यांना टीसीशिवाय प्रवेश नाकारतील किंवा जर प्रवेश नाकारल्याने एखाद्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले तर अशा शाळांवर कारवाई केली जाईल. तसेच शाळेतील मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT