Blast
Blast टिम ई सकाळ
Election News

स्फोटामध्ये दोन जण ठार; मणिपुरमध्ये मतदानापुर्वी हिंसाचाराची मालिका सुरुच

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशात पाच राज्याच्या निवडणुकीचा जल्लोष पाहायला दिसतोय. अशात मागील काही दिवसापासुन मात्र मणिपुरमध्ये (Manipur) हिंसाचाराचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मणिपूरमध्ये 60 जागांसाठी येत्या २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च ला मतदान (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे यात मतदानाच्या दोन दिवस आधी शनिवारी रात्री चुराचंदपूर (Churachandpur) जिल्ह्यातील स्फोट झाला. या स्फोटात एका लहान मुलासह दोन जण ठार आणि पाच जण जखमी झाले. गँगपिमुअल (Gangpimual) गावात हा स्फोट झाला.

या स्फोटात पाच जण जखमी झाले असुन लहान मुलासह दोन जणांचा मृत्यु झालाय.हा स्फोट कोणी घडवुन आणला याविषयी अद्याप माहिती नसुन पोलीस याविषयी अधिक तपास करत आहे.मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात हिंसाचाराचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत यातील स्फोटाचे हे प्रकरण ही हिंसाचाराची पहिली मोठी घटना होती.

राज्यातील निवडणुकीशी संबंधित हिंसाचार वाढला असताना, मणिपुरचे राज्यपाल ला गानेसन (La Ganesan) यांनी काही दिवसापुर्वी हिंसाचार टाळण्याचे तसेच अनुचित प्रकार घडु नये आणि शांततापूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडावी असे आवाहन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT