Manipur Assembly Election 2022: मणिपुरमध्ये हिंसाचाराचे पडसाद; राज्यपालांनी केले शांततेचे आवाहन

मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे
La Ganesan
La Ganesanटिम ई सकाळ

सध्या देशात पाच राज्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीचा जोश पाहायला मिळतोय. मणिपूर (Manipur) मध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याच पार्श्वभुमीवर मणिपूरपुरमध्ये हिंसाचाराचे पडसाद उमटत आहे. राज्यातील निवडणुकीशी संबंधित हिंसाचार वाढला असताना, मणिपुरचे राज्यपाल ला गानेसन (La Ganesan)यांनी हिंसाचार टाळण्याचे आवाहन केले आहे.

मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी जारी केलेल्या सुचनेमध्ये राज्यपाल यांनी आवाहन केले आहे. “अनुचित प्रकार घडावे नाही तसेच शांततापूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडावी जेणेकरुन या विधानसभा निवडणुकीत लोकांना मुक्तपणे त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल.”

La Ganesan
भाजप-सपा समर्थकांत जोरदार राडा; बसपाचे उमेदवार धावले सपाच्या मदतीला

राज्यपाल म्हणाले, “राज्यातील सर्व नागरिकांनी त्यांचा मतदानाचा हक्क मुक्तपणे आणि निष्पक्ष वापरावा. हा अधिकार येत्या पाच वर्षांत जनतेचे भवितव्य घडवणार. राज्याच्या या लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक संस्था सहकार्य करेल, अशी मला आशा आहे.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com