Kasba By- Election esakal
Election News

Kasba By- Election: कसबा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का; 'या' नेत्याची प्रचारातून माघार

पुण्यातून भाजपची धाकधूक वाढविणारी बातमी

रुपेश नामदास

कसबा पोटनिवडणुकीत भाजपला सगळ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. कसबा पोटनिवडणुक मविआ आणि भाजपने प्रतिष्ठेची केला आहे.

मविआकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांच्यात थेट लढत होत आहे. या लढतीत महाविकास आघाडीसोबत भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेत्यांनी तळ ठोकलं आहे, सोबतच स्टार प्रचाराकांची फौज मैदानात तयार ठेवली आहे.

मात्र आता भाजपला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. कसबा मतदारसंघातील पाच वेळा आमदार राहिलेले, खासदार गिरीश बापट या पोटनिवडणुकीच्या प्रचारातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

अशी माहिती बापट यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. मागील काही अनेक दिवसांपासून खासदार गिरीश बापट यांची प्रकृती ठीक नाही.

त्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे बापटांनी प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT