Congress esakal
Election News

Chhattisgarh Exit Poll: छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं उधळणार गुलाल?; स्पष्ट बहुमताचे संकेत

पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Assembly Elections 2023 Exit Poll : पाच राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. याचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. पण या निवडणुकांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल आता समोर आले आहेत. Chhattisgarh exit Polls Result

विविध सर्व्हेमधून काही अपेक्षित तर काही धक्कादायक संभाव्य निकाल समोर आले आहेत. त्यानुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता राखणार असल्याचं चित्र आहे. छत्तीसगडमध्ये एकूण ९० जागा आहेत. त्यापैकी ४५ हा बहुमताचा आकडा आहे. (Chhattisgarh Exit Poll Congress may stick on power in Chhattisgarh a clear majority signal)

इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया

काँग्रेस छत्तीसगडमध्ये बहुमताचा आकडा पार करणार असल्याचं चित्र आहे. या राज्यात काँग्रेसला ४० ते ५० जागा मिळतील असा इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया या एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर भाजपला ३६ ते ४६ जागा मिळतील. तसेच इतर पक्षांकडं १ ते ५ जागा जातील असंही हे एक्झिट पोल सांगत आहेत. Chhattisgarh exit Polls Result

इंडिया टीव्ही-सीएनएक्स

इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्व्हेनुसार, काँग्रेसला छत्तीसगडमध्ये ४६ ते ५६ जागा मिळतील. तर भाजपला ३०-४० जागा तसेच इतर पक्षांना ३-५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. exit polls news

एबीपी-सीव्होटर

एबीपी-सीवोटरच्या सर्व्हेनुसार, काँग्रेसला ४१ ते ५३ जागा तर भाजपला ३६ ते ४८ अन्य पक्षांना ०- ४ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

न्यूज २४ - टुडे चाणक्य

या संस्थांच्या सर्व्हेनुसार, काँग्रेसला छत्तीसगडमध्ये ५७ जागा मिळतील. भाजपला ३३ तर अन्य पक्षांना ० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रिपब्लिक-मॅट्रिज

रिपब्लिक-मॅट्रिजच्या सर्व्हेनुसार, काँग्रेसला ४४ ते ५२ जागा तर भाजपला ३४ ते ४२ जागा आणि अन्य पक्षांना ०-२ जागांवर समाधान मानवं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT