Bharat Jodo Yatra  sakal
Election News

MP Election: मध्य प्रदेशात 'भारत जोडो यात्रा' ठरली फेल? ज्या ठिकाणांहून गेली तिथं 17 जागा काँग्रेसनं गमावल्या!

विजयाची अपेक्षा असलेला मध्य प्रदेशातील निकाल विरुद्ध लागल्यानं काँग्रेसमध्ये निराशेचं वातावरण आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : विजयाची अपेक्षा असलेला मध्य प्रदेशातील निकाल विरुद्ध लागल्यानं काँग्रेसमध्ये निराशेचं वातावरण आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ११४ जागा जिंकल्या होत्या. तर या निवडणुकीत ही संख्या ६६ वर थांबली. या राज्यात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण ही यात्रा ज्या ज्या भागातून गेली तिथल्या तब्बल १७ जागा भाजपनं गमावल्या आहेत. (Congress lost 17 seats in Madhya Pradesh where Bharat Jodo Yatra went)

380 किमीचा टप्पा

या यात्रेत तब्बल ३८० किमीचा टप्पा पार केला होता. यामध्ये २१ विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा गेली होती. पण रविवारी जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले तेव्हा काँग्रेसला मोठा झटका बसला. कारण ज्या २१ मतदारसंघातून भारत जोडो यात्रा गेली तिथल्या १७ जागांवर भाजपनं विजय मिळवला आणि काँग्रेसला हार पत्करावी लागली. (Marathi Tajya Batmya)

इंदूरमध्ये काँग्रेसला फटका

राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या काळात मध्य प्रदेशातील मालवा-निमाड भागातील सहा जिल्हे बुरहानपूर, खंडवा, खरगोन, इंदूर, उज्जैन आणि आगर मालवा इथून गेली. काँग्रेसनं या २१ जागांपैकी केवळ ४ जागांवर विजय मिळवला. इंदूर जिल्ह्यातील सर्व आठ मतदारसंघातून ही यात्रा गेली होती. पण इथल्या सर्वच्या सर्व जागा भाजपनं जिंकल्या. (Latest Marathi News)

काँग्रेसनं गमावलं, भाजपनं कमावलं

२०१८ च्या निवडणुकीत या २१ जागांपैकी १४ जागा भाजपनं जिंकल्या होत्या. तर ७ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा काँग्रेससाठी आशादायी चित्र होतं. पण नेमकी परिस्थिती उलटली. उलट गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसनं आणखी चार जागा गमावल्या. तर भाजपच्या चार जागा वाढल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: राजा बहाद्दूरमिलमधील 'डी मोरा' पबमध्ये फ्रेशर पार्टीत अंडर 21 च्या मुलांचं तुफान राडा

Ganeshotsav 2025: ढोल-ताशा सरावासाठी तयार आहात? 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Akola Elections: अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम; इच्छुकांमध्ये विविध प्रतिक्रिया

राज्य उत्सवाचा राजकीय ‘इव्हेंट’ नको

'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपटातून उलगडणार प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट; हास्यजत्रेमधील 'हा' अभिनेता दिसतोय मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT