Rajasthan Election Result 
Election News

Eknath Shinde: विजयानंतर बालमुकुंदाचार्यांनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार; 'हिंदुहृदयसम्राट' का म्हटलं? हे ही सांगितलं

राजस्तानातील हवामहल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य यांचा विजय झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जयपूर : राजस्तानातील हवामहल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य यांचा विजय झाला आहे. आपल्या विजयानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. तसेच प्रचारावेळी पोस्टर आपण त्यांचा हिंदुहृदय सम्राट असा उल्लेख का केला हे सांगताना बाळासाहेब ठाकरेंचे ते प्रतिरुप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (During Rajsthan Election who mentioned Eknath Shinde as Hinduhridaysamrat after winning Bal Mukundacharya thanks him)

म्हणून त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणालो

बालमुकुंदार्यांचा अवघ्या ९७४ मतांनी निसटता विजय झाला आहे. पण राजस्थानातील विजयासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांचाही हातभार असल्याचं सांगत त्यांचे आभार मानले आहेत. बालमुकुंदाचार्य म्हणाले, "मी शिंदे साहेबांचे धन्यवाद देतो ते इथं माझ्या प्रचारासाठी आले. त्यांचा दौरा इतरत्र होता पण माझ्या प्रेमापोटी ते इथं काहीकाळ आले होते तसेच त्यांनी मला सहकार्य केलं. (Latest Marathi News)

हिंदुंचे चांगले नेते मानून लोकांनी त्यांना सन्मान दिला. बाळासाहेब ठाकरेंची जागा तर कोणी घेऊ शकत नाही पण त्यांचे शिष्य असल्यानं एकनाथ शिंदे त्यांचे प्रतिरुप आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांना हिंदृहृदय सम्राट म्हटलं होतं. जो सनातनची भाषा करेल,

बालमुकुंदाचार्य पुढे म्हणाले, "इथले सनातनी मतदार होते त्यांनी इथून वेगानं पलायन केलं. या ठिकाणी इतकं भीतीचं वातावरण होतं की, त्यांनी २-५ कोटींची आपली पालमत्ता केवळ २०-२५ लाखांत विकून गेले. कारण त्यांचा व्यवसाय चौपट झाला होता. (Latest Marathi News)

आमच्या प्राचीन ठिकाणांना आणि मंदिरांची मोडतोड करण्यात आली होती. या साऱ्या समस्यांमुळं सनातनींनी पलायन केलं. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळं राजस्थानातील परिस्थिती बिघडली होती. पण आता जो धर्माच्या बाजूनं चालेल त्याच्यासोबत आम्ही भाजपच कुटुंब राहू. पण जे सनातनला संपवायची भाषा करतील आणि कीडेमकौडे बोलेन त्याच्यासाठी माझी गदाच असेल"

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण?

भाजपाचं एक कुटुंब आहे, हा भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जागातील राजकीय परिवार आहे. या परिवारात एक परंपरा आहे की सर्वांच्या सहमतीनं सामुहिक स्वरुपात मुख्यमंत्री निश्चित केला जातो. कमळाचं फुल हाच आमचा मुख्यमंत्री आहे. पंतप्रधान मोदींचं जे विकासाचं व्हिजन आहे तेच आमचंही आहे. मुख्यमंत्री कोणीही असलं तरी आम्ही सर्वांनी मिळून विकास करु असंही यावेळी बालमुकुंदाचार्य यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

Latest Marathi News Live Update : किनवट नगरपालिका निवडणूकीत भाजप आणि ठाकरे सेनेत थेट लढत

SCROLL FOR NEXT