Eight candidates announced by AAP in Punjab Again ticket to Sushil Kumar Rinku Sakal
Election News

Lok Sabha Polls 2024 : पंजाबमध्ये ‘आप’कडून आठ उमेदवार जाहीर; सुशीलकुमार रिंकू यांना पुन्हा तिकीट

आम आदमी पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधील ८ उमेदवारांची नावे घोषित केले आहे. यात विद्यमान खासदार सुशीलकुमार रिंकू (जालंधर) यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधील ८ उमेदवारांची नावे घोषित केले आहे. यात विद्यमान खासदार सुशीलकुमार रिंकू (जालंधर) यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

‘इंडिया’ आघाडीचा घटकपक्ष असलेल्या ‘आप’ने पंजाबमध्ये काँग्रेसशी आघाडी केलेली नाही. पंजाबमधील १३ जागांपैकी ८ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. यात अमृतसरमधून कुलदीप सिंग धालीवाल, बठिंडा येथून गुरमित सिंग कुदियान, पतियाळा येथून डॉ. बलिबीर सिंग, फतेहगड साहिबमधून गुरुप्रित सिंग व संगरूरमधून गुरमित सिंग मीट हयर यांना उमेदवारी दिली आहे.

पंजाबमध्ये लोकसभेच्या तेरा जागा असून या सर्व जागांवर आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार आहे. आप आणि काँग्रेसे पंजाबवगळता चंडीगड, हरियाना, दिल्ली, गुजरात आणि गोवा या ठिकाणी एकत्र लढत आहे. पंजाबमध्ये चौरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. आम आदमी पक्ष, काँग्रेस, भाजप आणि अकाली दल यांच्यात कडवी लढत पाहावयास मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT