Kasba Bypoll Result Ravindra Dhangekar won election esakal
Election News

Kasba By-Election Result: एकट्या धंगेकरांना हरवण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत उतरली होती पूर्ण फौज, पण..

रुपेश नामदास

Ravindra Dhangekar News: कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर निर्णायक आघाडीकडे झेपावत आहेत. सातव्या फेरीमध्ये हेमंत रासनेंनी धंगेकरांच्या लीडला ब्रेक लावला, पण त्यापुढच्या फेऱ्यांमध्ये पुन्हा धंगेकर पुढे निघून गेले आहेत.

दरम्यान काहीच वेळात हा निकाल जाहीर होईल मात्र रविंद्र धंगेकर यांचा पराभव करण्यासाठी केंद्रातून सुत्र हलवण्यात आली होती.

कसब्यात भाजपचा विजय करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील २०-२५ मंत्री महाराष्ट्रातील 65 आमदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे महापालिकेतील ९० पेक्षा जास्त नगरसेवक या प्रचारत सामील झाले होते.

तरी देखील रविंद्र धंगेकर यांचा पराभव भाजप करू शकलं नाही. २५ वर्षाच्या भाजपच्या या गडाला काँग्रेसने सुरूंग लावला आहे.

भाजपसह शिंदेंची शिवसेना मोठ्या ताकतीने या निवडणुकीत उतरली होती तरी देखील मविआने चारीमुंड्या चित करत विजय खेचून आणला आहे. त्यामुळे कसब्यात मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहिला मिळत आहे.

११०४० मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी ६१७७१ मत पडली तर विजयी रविंद्र धंगेकर यांना ६२५९९ इतकी मत पडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT