Virender Sehwag campaigning for Congress' Anirudh Choudhary in Haryana's Tosham constituency esakal
Election News

Haryana Election Result 2024: हरियानाची राजकीय खेळपट्टी ज्यावर वीरेंद्र सेहवागने केली होती 'फलंदाजी', आता कोण करतंय स्कोर?

Virender Sehwag Backs Congress Candidate Anirudh Choudhary in Tosham: तोशामच्या निवडणुकीत चचेऱ्या भावंडांमधील ही चुरस राजकीय रंगमंचावर महत्त्वाची ठरली आहे. आता शेवटचा निकाल काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, पण सध्या श्रुती चौधरी आघाडीवर आहे, हे निश्चित आहे.

Sandip Kapde

जम्मू-काश्मीर आणि हरियाना राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. हरियानामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली तर जम्मू काश्मिरमध्ये भाजप दुसऱ्या नंबरवर आहे. अजून आकडे हातात येत आहेत. हरियानातील विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय चकमक पाहायला मिळाली आहे. विशेषतः तोशाम या चर्चित मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

या मतदारसंघात भाजपा उमेदवार श्रुती चौधरी आणि काँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी एकमेकांसमोर आहेत. दोघेही एकाच कुटुंबाचे सदस्य असून, माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांच्या तिसऱ्या पिढीचे ते प्रितिनिधित्व करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकाच घरातील राजकीय वर्चस्वासाठीची लढाई आहे.

क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने केला होता काँग्रेससाठी प्रचार

तोशामच्या निवडणुकीला आणखी महत्त्वाचे करण्यामागचे एक कारण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने काँग्रेसच्या उमेदवार अनिरुद्ध चौधरीसाठी प्रचार केला होता. सेहवागने आपला भाऊ असा उल्लेख करत मतदारांना अनिरुद्धसाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते.

भावंडांमधील टक्कर

भाजपाने श्रुती चौधरीला उमेदवारी दिली असून ती माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांची नात आहे. तर, काँग्रेसने बंसीलाल यांचे नातू अनिरुद्ध चौधरीला उमेदवारी दिली आहे. श्रुतीच्या आई किरण चौधरी यांनी बंसीलाल यांची राजकीय परंपरा पुढे नेली होती. मात्र आता अनिरुद्धच्या भूमिकेमुळे या लढाईत आणखी रंगत आली आहे.

सेहवागच्या प्रचाराचे महत्त्व

वीरेंद्र सेहवागने अनिरुद्ध चौधरीला मोठा भाऊ मानत, त्याच्या प्रचारासाठी तोशाममध्ये मोठा उत्साह दाखवला. सेहवागने म्हटले होते की, "जेव्हा मोठा भाऊ काही काम करतो, तेव्हा त्याला मदत करणे आपले कर्तव्य आहे." सेहवागच्या या उपस्थितीने तोशामची निवडणूक अजून जास्त चर्चेत आली.

तोशाम मतदारसंघात यावेळी 62% मतदान झाले. भाजपाच्या श्रुती चौधरी सध्या आघाडीवर आहेत, त्यांना 43,338 मते मिळाली आहेत तर अनिरुद्ध चौधरी मागे असून त्याला 8,665 मतांनी मागे टाकले आहे. या आकड्यांमुळे श्रुतीच्या विजयाची शक्यता जास्त दिसत आहे.

किरण चौधरींचा भाजपात प्रवेश-

किरण चौधरी यापूर्वी काँग्रेसच्या मोठ्या नेत्या होत्या त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला होता. भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवले आणि जाट समाजात एक महत्त्वाचा संदेश दिला. 2019 च्या निवडणुकीत किरण चौधरीने भाजपाच्या शशी रंजन परमार यांना हरवून विजय मिळवला होता, पण या वर्षी परिस्थिती बदलली आहे.

श्रुती चौधरी की अनिरुद्ध चौधरी?

तोशामच्या निवडणुकीत चचेऱ्या भावंडांमधील ही चुरस राजकीय रंगमंचावर महत्त्वाची ठरली आहे. आता शेवटचा निकाल काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, पण सध्या श्रुती चौधरी आघाडीवर आहे, हे निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी : नाईक

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT