प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था  Sakal
Election News

इंदापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक; पहिल्याच दिवशी ६ अर्ज

पतसंस्थेची स्थापना १९२५ साली शंकर हरी जावडेकर यांनी केली असून गेली १६ वर्षे या संस्थेवर शिक्षक समितीचे वर्चस्व आहे.

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सन २०२१/२२ ते २०२५/२६ या पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीसहा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूकनिर्णयअधिकारी तथा इंदापूर तालुका सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी दिली.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना १९२५ साली शंकर हरी जावडेकर यांनी केली असून गेली १६ वर्षे या संस्थेवर शिक्षक समितीचे वर्चस्व आहे. या संस्थेची उलाढाल १३७ कोटी रुपयांच्या घरात असून तालुका विकासात संस्थेचे महत्वपूर्ण योगदानआहे. निवडणुकीत ९५१मतदार आपला हक्कबजावणारआहेत. शिक्षक समितीची सत्ता उलथवून टाकण्या साठी स्वाभिमानी शिक्षक पॅनेलने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. सन २००७ ला ही संस्था बिनविरोध झाली मात्रत्यानंतर २०१५ साली शिक्षकसमितीविरूद्धस्वाभिमानी शिक्षक पॅनेल अशी लढत झाली. लढतीत शिक्षक विकास पॅनेलने निर्विवादसत्तास्थापन केली.

संस्थेवर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व मोडूनकाढण्या साठी सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांना मानणाऱ्या शिक्षकांनीसाम,दाम ,दंड,भेद निती अवलंबली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असली तरी शिक्षक समितीस विजयाची खात्री आहे.या निवडणुकीसाठी संगिता पांढरे,विद्यमान सभापती वसंत फलफले,माजी सभापती सुनिल वाघ,सुनिल शिंदे, संतोष गदादे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

या निवडणूकीसाठी दि.२१ मार्च ते २५ मार्च पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इंदापूर कार्यालयात नामनिर्देश दाखल करतायेईल.दाखलअर्जाची छाननी दि.२८ मार्च रोजी पार पडेल.दि. २९ मार्च ते दि.१२ एप्रिल दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. दि.१३ एप्रिलरोजी उमेदवारांना चिन्हवाटप तर दि.२४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत प्रत्यक्ष मतदान होईल. त्याचदिवशी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अर्ध्या तासानेमतमोजणी होऊन निकाल जाहिर केला जाणार आहे.

इंदापूर पगारविभाग सर्वसाधारण-३,भिगवण -लोणी देवकर पगार विभाग -४,सणसर-निमसाखर पगार विभाग सर्वसाधारण -३, लासुर्णे-निमगांव पगार विभागसर्वसाधारण- ३, बावडा-रेडणी पगार विभाग सर्वसाधारण - ३, महिला सदस्य - २, अनु.जाती/जमाती -१, इतर मागासवर्गीय - १, भ. ज./वि./जमाती/विशेष मागास प्रवर्ग -१ असे एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT