congress Rahul Gandhi News Sakal
Election News

karnataka Election : कोणत्या इंजिनला कमिशनचा किती वाटा मिळाला?, राहुल गांधींचा सवाल; मोदी यांच्या मौनावर टीका

कर्नाटकात गेल्या तीन वर्षांपासून भाजपचे सरकार असल्याने पंतप्रधानांना येथील भ्रष्टाचाराची जाणीव आहे.

सकाळ वृत्तसेवा

karnataka Election बंगळूर - ४० टक्के ‘कमिशन’मधून ‘डबल इंजिन सरकार’ला किती वाटा मिळाला, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे केला. कर्नाटकातील भ्रष्टाचारावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते अनेकल येथील प्रचारसभेत ते बोलत होते. अदानींचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्याबद्दल आपणास खासदारपदावरून अपात्र ठरवल्याचा आरोपही त्यांनी केला.

कर्नाटकात गेल्या तीन वर्षांपासून भाजपचे सरकार असल्याने पंतप्रधानांना येथील भ्रष्टाचाराची जाणीव आहे. तुम्ही फक्त ‘डबल इंजिन सरकार’ म्हणत आहात; पण कर्नाटकातील लोकांना सांगा, की कोणत्या इंजिनला ४० टक्के कमिशनपैकी किती पैसे मिळाले. कर्नाटकातील कंत्राटदारांच्या संघटनेने पंतप्रधानांना पत्र लिहून ४० टक्के कमिशन वसूल केले आहे, असे सांगूनही मोदींनी उत्तर दिलेले नाही.

घोटाळ्यांवर घोटाळे झाले आहेत. पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, सहा‍य्यक अभियंता यांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. काँग्रेसच्या एका नेत्याला भाजपच्या एका आमदाराने सांगितले की, म्हैसूर सँडलवूड घोटाळ्यात एका आमदाराचा मुलगा आठ कोटी रुपयांसह पकडला गेला आहे.

आणि तो दोन हजार ५०० कोटी रुपये देऊन मुख्यमंत्रिपद विकत घेऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान येऊन सांगतात की काँग्रेसने ९१ वेळा त्यांचा अपमान केला आहे; पण कर्नाटकने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काय केले, कोणती चौकशी झाली आणि किती लोकांना तुरुंगात टाकले, हे आधी सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT