KRS Party
KRS Party Sakal
Election News

Karnataka Vidhansabha Election : कर्नाटकात ‘केआरएस’ची मोर्चेबांधणी सुरू

मिलिंद देसाई

कन्नड भाषा आणि कर्नाटकाची अस्मिता पुढे करून स्थापन केलेल्या कर्नाटक राष्ट्र समिती (केआरएस) पक्षाने २०० हून अधिक मतदारसंघांत उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

कन्नड भाषा आणि कर्नाटकाची अस्मिता पुढे करून स्थापन केलेल्या कर्नाटक राष्ट्र समिती (केआरएस) पक्षाने २०० हून अधिक मतदारसंघांत उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केआरएस पक्षाचा निवडणुकीत कोणाला फटका बसणार आणि केआरएस पक्ष विधानसभा निवडणुकीत खाते उघडणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता निवडणूक लढविली जाणार असून, सध्या पक्षातर्फे विविध मतदारसंघांतील उमेदवार निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे केआरएस प्रादेशिक पक्ष म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

व्यावसायिक असणाऱ्या रवी कृष्णा रेड्डी यांनी सुरुवातीची काही वर्षे कन्नड भाषा आणि प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा हातात घेऊन आंदोलने व मोर्चे काढले होते. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आल्यानंतर रेड्डी यांनी २०१९ मध्ये कर्नाटक राष्ट्र समिती पक्षाची स्थापना केली होती. पक्षाची स्थापना झाल्यानंतर केआरएस पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असून २०० हून अधिक मतदार संघात पक्षाने उमेदवार उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाने उमेदवारी अर्ज मागविले होते. त्याला प्रतिसात देत राज्यातील विवीध मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी ३०० हून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर पक्षाने पहिली व दुसरी यादी जाहीर करीत ११९ मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत.

भ्रष्टाचारमूक्त कर्नाटक, लोकांना रोजगार, राज्यातील वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रादेशिक अस्मिता कायम ठेवणे, सर्वसामान्य लोकांना नेतृत्व करण्याची संधी देणे आणि कर्नाटकात प्रबळ प्रादेशिक पक्ष निर्माण करण्याच्या दृष्टीने उमेदवार रिंगणात उतरल्याची माहिती केआरएस पक्षातर्फे दिली आहे. आतापर्यंत कोलार, मंगळूर, जमखंडी, चामराजनगर, चित्रदुर्ग, नरगुंद, मडीकेरी, रायचूर, उडपी, यादगिरी आदी मतदारसंघात इतर पक्षात नाराज असलेल्याना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच दोन दिवसात उर्वरित मतदार संघातील उमेदवार जाहीर केले जाणार आहेत.

राज्यात काँग्रेस, भाजप, निजद पक्षाची मोठी ताकद असताना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या केआरएस पक्षासमोर आवाहन असणार आहे. अस्मितेचा मुद्दा घेऊन विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या केआरएसला राज्यातील जनता स्वीकारणार का? हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार असले तरी अनेक ठिकाणी इतर पक्षात नाराज असलेल्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळे केआरएसला झालेले मतदान राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

केआरएस पक्षाचे चिन्ह बॅटरी असून पक्ष वाढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष रवी कृष्णा रेड्डी यांनी जण चैतन्य यात्रा काढली होती, यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे केआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विविध दावे केले जात असले तरी या पक्षाचा कोणाला फटका बसणार हे निवडणुकीनंतरच दिसून येणार आहे. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुढे करीत देशातील अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले आहेत. त्याच प्रमाणे केआरएस प्रादेशिक मुद्दा घेउन पुढे जाणार आहे.

एक नजर

  • २०१९ मध्ये केआरएसची स्थापना

  • २०० हून अधिक मतदारसंघांत उमेदवार देण्याचा निर्णय

  • आतापर्यंत ११९ उमेदवार जाहीर

  • इतर पक्षांतील नाराजांवर लक्ष

दखल घ्यावी लागेल - पक्षाच्या नेत्याचा दावा

कन्नड भाषेवर अन्याय झाल्याचा आरोप करीत या पक्षाच्या माध्यमातून सातत्याने आंदोलने केली जातात. त्यामुळे उमेदवारांचा विजय झाला नाही, तरी इतर पक्षांचे गणित बिघडण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीत पक्षाची दखल घ्यावी लागेल, असा दावा या पक्षाच्या नेत्यातून केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT