NCP Party
NCP Party Sakal
Election News

NCP Party : राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात ५० उमेदवार उभे करणार?

मिलिंद देसाई

महाराष्ट्रात अनेक वर्षे सत्तेवर राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर राज्यांमध्येही हातपाय पसरण्याचा प्रयत्न करीत आहे.

महाराष्ट्रात अनेक वर्षे सत्तेवर राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर राज्यांमध्येही हातपाय पसरण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच, ‘राष्ट्रवादी’ने यापूर्वीही कर्नाटकात विधानसभेसाठी काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. मात्र, ‘राष्ट्रवादी’ला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता, तरीही यावेळी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत पन्नास उमेदवार उभे करण्याचा विचार राष्ट्रवादीने सुरू केला आहे. त्यामुळे कर्नाटकात राष्ट्रवादीला यश मिळणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते असलेले आणि अतिशय कमी वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या शरद पवार यांनी १९९९ मध्ये स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राष्ट्रवादीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. तसेच काँग्रेसपासून फारकत घेतलेल्या पवार यांनी काँग्रेस पक्षाबरोबर युती केली. तसेच विविध राज्यांतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी अपयश मिळाले आहे. कर्नाटक राज्यात पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादी सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने २०२१ मध्ये बंगळूर येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते.

कार्यालयाच्या उद्‌घाटनासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बंगळूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी बंगळूर येथे मोठी मोटारसायकल रॅली काढली होती, तसेच बेळगाव आणि परिसरातील अनेक कार्यकर्तेही या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी बंगळूर दौऱ्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तसेच पवार व शिवकुमार यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली. त्यामुळे कर्नाटकातदेखील राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच कर्नाटकातील विद्यमान राजकीय घडामोडींबाबत चर्चा करण्यात आली होती.

२०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे उद्‌घाटन व शक्तिप्रदर्शन पाहता राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढविली जाण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा एेकावयास मिळत होती. आर. हरी यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर हरी यांनीच बनासवाडी येथे पक्ष कार्यालय सुरू केले. त्या कार्यालयाचे उद्‌घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे राज्यभरातील कार्यकर्ते बंगळूरला गेले होते, पण पवार व शिवकुमार यांची झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात पवार हे खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने बंगळूरला गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पवार यांची भेट घेतली होती. बोम्मई यांची त्यावेळी नुकतीच मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. त्यामुळे ती भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती.

त्यात पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. चार महिन्यांपूर्वी आर. हरी यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. हरी यांनीच बाणसवाडी येथे पक्ष कार्यालय सुरू करून विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर विविध मतदारसंघांचा आढावा घेऊन राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पवार यांचे कर्नाटकातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत. पवार यांना मानणारा वर्ग कर्नाटकातही आहे.

म. ए. समितीला नेहमीचा पाठिंबा

ज्येष्ठ नेते शरद पवार हे सीमाभागातील मराठी जनतेचे आधारस्तंभ आहेत. तसेच राष्ट्रवादीने आतापर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीला नेहमीच पाठबळ दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे, मात्र इतर भागांत मात्र राष्ट्रवादी उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: सकाळी 11 वाजे पर्यंत देशभरात 23.66 टक्के मतदान, महाराष्ट्र सर्वात मागे

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT