satish jarkiholi and maruti astagi
satish jarkiholi and maruti astagi sakal
Election News

Satish Jarkiholi : सतीश जारकीहोळी यांची बालेकिल्ल्यातच झुंज

मिलिंद देसाई

काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश जारकीहोळी यांचा बालेकिल्ला असलेल्या यमकनमर्डी मतदारसंघात २०१८ मध्ये झालेली निवडणूक लक्षवेधी ठरली होती.

काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश जारकीहोळी यांचा बालेकिल्ला असलेल्या यमकनमर्डी मतदारसंघात २०१८ मध्ये झालेली निवडणूक लक्षवेधी ठरली होती. या वेळी भाजपचे उमेदवार मारुती अष्टगी यांचा कमी मताने पराभव झाला होता. त्यामुळे या निवडणुकीची अनेक दिवस चर्चा सुरू होती. अतिशय कमी मताने पराभूत झालेल्या अष्टगी यांना त्यानंतर भाजप सरकारने महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला होता; तर उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर प्रचार न करताही आपण विजयी होऊ शकतो, हे सतीश जारकीहोळी यांनी दाखवून दिले होते.

२००८ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करताना बागेवाडी व हुक्केरी मतदारसंघातील गावांचा समावेश करून यमकनमर्डी मतदारसंघ निर्माण करण्यात आला. तसेच हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव ठेवण्यात आला. या मतदारसंघात बेळगाव आणि हुक्केरी तालुक्यातील अनेक मराठी गावांचा समावेश आहे. त्यामुळे २००८ च्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने या ठिकाणी आपला उमेदवार उभे केला होता. तसेच मोठ्या प्रमाणात मतेही मिळविली होती. मात्र, मतदारसंघात कन्नड भाषिक असलेल्या अनुसूचित जमाती व लिंगायत समाजाची मते निर्णायक आहेत. त्यामुळे काँग्रेस व भाजपकडून नेहमीच कन्नड व मराठी भाषिकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, मराठी भाषिक ज्याच्या बाजूने उभे राहतात. त्याला निवडणुकीत मताधिक्य मिळते, असे आतापर्यंतच्या निवडणुकीतून दिसून आले आहे.

२००८ व २०१३ मध्ये काँग्रेसला मोठ्या मताधिक्याने विजय मिळाल्यामुळे २०१८ मध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सतीश जारकीहोळी यांनी आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी फिरण्याऐवजी राज्यातील इतर मतदारसंघात काँग्रेसचा विजय कसा होईल, याकडे लक्ष दिले. तसेच आपला विजय निश्चित आहे, असे समजून जारकीहोळी यांनी मतदारसंघात प्रचार करण्याकडे दुर्लक्ष केले. तर भाजपने निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी गावागावात जोरदार प्रचार करण्यावर भर दिला. तसेच राज्यातील अनेक भाजपच्या नेत्यांनी मतदारसंघात येऊन प्रचार करण्यावर भर दिला. त्यामुळे अष्टगी यांना पाठबळ मिळाले.

मतमोजणी दिवशी सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत होती. शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत भाजपचे अष्टगी काही मतांनी पुढे होते. त्यामुळे काँग्रेसच्या जारकीहोळी यांना पराभवाला सामोरे जावे लागेल, अशी चर्चा सुरु होती. निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर जारकीहोळी यांना ७३,५१२ तर भाजपच्या मारुती अष्टगी यांना ७०,६६२ मते मिळाली. त्यामुळे अष्टगी यांना २,८५० मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीची राज्यभरात चर्चा झाली होती. तसेच निवडणूक झाल्यानंतरही मतदारसंघात पुन्हा एकदा ताकद निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.

समितीचीही चाचपणी सुरू

यमकनमर्डी मतदारसंघाची रचना झाल्यापासून २००८, २०१३ व २०१८ मध्ये काँगेसचे सतीश जारकीहोळी व भाजपचे मारुती अष्टगी यांच्यात लढत झाली होती. मात्र, यावेळी भाजपने अष्टगी यांच्याऐवजी बाळासाहेब हुंद्री यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच समितीनेही आपला उमेदवार उभे करण्याबाबत या ठिकाणी चाचपणी सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT