Girish Bapat esakal
Election News

Kasba Bypoll Election: उमेदवार कोणीही असो, कसब्यात 'बापट'च कसे किंगमेकर! जाणून घ्या

भाजपच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक नाव म्हणजे गिरीश बापट

रुपेश नामदास

राज्यातील भाजपच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक नाव म्हणजे गिरीश बापट हे नेहमीच चर्चेत असतात.

गिरीश बापट यांनी राजकारणाची सुरूवात जनसंघापासून केली. ते मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. नगरसेवकापासून राजकारण सुरू झाले.

1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या पुणे लोकसभा मतदारसंघातून आजवरचा इतिहास मोडीस काढत गिरीश बापट खासदार झाले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा ३ लाख २४ हजार ६०८ मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळाविला. पुण्याच्या राजकारणात आजही बापटांचा दबदबा आहे.

बापट यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.

कोण आहेत गिरीश बापट?

गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत घेतले.

बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये 19 महिन्यांचा कारावास झाला ते नाशिक जेलमध्ये भोगला.

गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखले जातात. राज्यात सत्त कोणाची ही असली तरी आपले काम साधून घेण्याची कला गिरीश बापट यांना उत्तम अवगत आहे.

तगडा लोकसंपर्क ही गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जाते. सगळ्या पक्षातील नेत्यांसोबत प्रेमाने, मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे गिरीश बापट यांना राजकारणात अडचण आली नाही.

गिरीश बापट यांचा पारंपरिक मतदारसंघ कसबा आहे. तेथून ते सलग पाच वेळा आमदार राहिले आहे. त्यामुळे मतदारसंघावर मजबूत पकड आहे. त्यांच्या शब्दा बाहेर जाणार नाहीत अशी कार्यकर्ते त्यांनी तयार केली आहे.

त्यामुळे आता लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजप बापटांना सोडून प्रचार करू शकत नाहीत. कसब्यात ब्राह्मण मतदारांचा टक्का मोठा आहे. आणि बापट यांच्या शब्दाला मानणारा आहे.

बापट आजारी असून देखील भाजपमधील दिग्गज नेते त्यांनी पोटनिवडणुकीत हस्तक्षेप करावा अशी विनंती करत आहेत.

गिरीश बापट यांची पुण्याच्या राजकारणात जादू किती हे पहायचं झालं तर एकच उदाहरण बस आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुका होत्या. पुण्यातल्या कारभाऱ्यांनी भाजपला हरवून कसबा जिंकायचंच अस ठरवलेलं. गिरीष बापट यांच्या विरोधात काँग्रेसने रोहित टिळक यांना उमेदवारी दिली. त्यावेळी रोहित टिळक यांच्या प्रचाराला खुद्द राहुल गांधी आले.

राहुल गांधी कसब्याच्या जागेसाठी प्रचारा येणं मोठी गोष्ट होती. काँग्रेसचा उत्कर्षाचा काळ होता. त्यात स्वतः टिळकांचा पणतू निवडणुका ला उभा राहतोय आणि नेहरूंचा पणतू प्रचाराला म्हणल्यावर ही निवडणुक रोहित टिळक मोठ्या मतांनी खिशात घातलील असं वाटत होतं.

पण कसब्यातल्या मतदारानी पुन्हा हुलकावणी दिली, गिरीष बापट मोठ्या फरकाने विजयी झाले. रोहित टिळक चक्क तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT