Katraj Dairy Election sakal
Election News

Katraj Dairy Election: भगवान पासलकर वेल्ह्यातून बिनविरोध

आता केवळ त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा बाकी राहिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतून गुरुवारी (ता. २४) आणखी दोघा जणांनी माघार घेतली आहे. यामुळे कात्रज डेअरीचे विद्यमान संचालक भगवान पासलकर हे वेल्हे तालुका मतदारसंघातून बिनविरोध झाले आहेत. आता केवळ त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा बाकी राहिली आहे.(Katraj Dairy Election Updates)

यामुळे कात्रज डेअरीच्या संचालक मंडळाच्या १६ पैकी तीन जागा आतापर्यंत बिनविरोध झाल्या आहेत. वेल्हे तालुका मतदारसंघातील दोन उमेदवारांनी गुरुवारी माघार घेतली आहे. या मतदारसंघाच्या एक जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने या मतदारसंघातून विद्यमान संचालक भगवान पवार यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे.

माणिक पासलकर आणि शोभा पासलकर या दोन उमेदवारांनी त्यांचे अर्ज माघारी घेतले आहेत. याआधी हवेली तालुका मतदारसंघातून म्हस्के यांनी माघार घेतली आहे. आतापर्यंत तीन जणांनी कात्रज डेअरीच्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. यामुळे आता १६ जागांसाठी ८८ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

या निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जांची २२ फेब्रुवारीला छाननी झाली. तेव्हापासून येत्या ८ मार्चपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे. त्यामुळे माघारीसाठी आणखी १२ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Maratha Reservation Protest: जेवळीतील पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन; उपोषण स्थगित तरी मराठा आरक्षणासाठी लढा कायम

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

SCROLL FOR NEXT