Katraj Dairy  Sakal
Election News

Katraj Dairy Election: १६ पैकी पाच जागा बिनविरोध

उर्वरित अकरा जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या १६ पैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित अकरा जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अकरा जागांसाठी येत्या २० मार्चला मतदान होणार आहे. बिनविरोध झालेल्यांमध्ये चार तालुकास्तरीय मतदारसंघ आणि अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील एका उमेदवाराचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी दौंड तालुकास्तरीय मतदारसंघातून राहुल दिवेकर आणि अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत भिंगारे हे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. या दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा येत्या २१ मार्चला होणार आहे. याआधी तालुकास्तरीय मतदारसंघातील तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत एकूण पाच उमेदवार बिनविरोध झाले आहेत. याआधी बिनविरोध झालेल्यांमध्ये हवेली, पुरंदर आणि वेल्हे या तीन तालुकास्तरीय मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या रिंगणात शिल्ल्क राहिलेल्या उमेदवारांची संख्या आणि नावे उद्या (बुधवारी) सकाळी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी येत्या २० मार्चला मतदान होणार असून, मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीनंतर लगेचच विजयी उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असल्याही सोबले यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील बारामती व इंदापूर हे दोन तालुके वगळता उर्वरित अकरा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक तालुकास्तरीय मतदारसंघ आहे. या तालुकास्तरीय मतदारसंघाच्या अकरा, महिलांसाठीच्या दोन आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), भटक्या जाती, विमुक्त जमाती (व्ही. जे. एन. टी.) आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

निवडणूक लागलेले मतदारसंघ

तालुकास्तरीय मतदारसंघ --- आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, मावळ, मुळशी आणि शिरूर (एकूण सात जागा).

महिला राखीव --- २ जागा

नागरिकांचा मागास प्रवर्ग --- १ जागा

भटक्या जाती-विमुक्त जमाती प्रवर्ग --- १ जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT