Election News

Madhya Pradesh Election : चर्चा एकच... सरकार कोणाचं? अटीतटीमुळे कोणालाही अंदाज येईना

नरेश हारनोळ : सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपत्रिकेच्या पेटीत बंद झाले. राज्यभर भाजप आणि काँग्रेस यांच्या अत्यंत अटीतटीची लढती रंगल्या आहेत. मतदानानंतरही दोन्ही पक्षांच्या दिग्गजांना बहुमताचा अंदाज बांधता आलेला नाही, त्यामुळे सर्वांचे लक्ष आता तीन तारखेला होणाऱ्या मतमोजणीच्या निकालाकडे लागले आहे.

मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी शुक्रवारी राज्यात मतदान झाले. यावेळी राज्यभर भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच प्रामुख्याने लढती रंगल्याचे दिसून आले. भाजपविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा काँग्रेसने घेतला. यामुळे राज्यातील काही प्रांतात काँग्रेससाठी पोषक वातावरण राहिले तर दुसरीकडे भाजपाने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडली बहीण योजना सुरू करीत महिलांच्या खात्यावर थेट पंधराशे रुपये जमा करणे सुरू केल्याने महिला मतदार भाजपच्या बाजूने झुकल्याचे दिसले. असे असले तरी भाजपाला एकतर्फी वाटावी असा निवडणुकीचा निकाल येण्याची शक्यता कमी आहे.

राज्यात सरासरी 72 टक्के मतदान झाले आहे. अनेक जागांवर चुरशीच्या लढती झाल्या आहेत. एकतर्फी विजयी होण्याच्या जागा अत्यंत कमी असल्याने सरकार कोणाचे होणार हे आत्ताच सांगणे दिग्गजांनाही शक्य होताना दिसत नाही. तरीही काँग्रेस आणि भाजपा आपापल्या विजयाचा आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा करीत असले तरी येत्या तीन तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतरच खरे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

भाजपात मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच

या निवडणुकीत प्रथमच भाजपाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जनतेसमोर आणलेला नाही तर काँग्रेसने कमलनाथ यांनाच मुख्यमंत्री म्हणून मतदारांसमोर आणले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण चौथ्यांदा मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असले तरी भाजपकडून मात्र त्यांच्याबाबत नाराजी असल्याचे बोलले जाते.

त्यामुळेच संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांना प्रोजेक्ट केलेच नाही त्यामुळे आत्तापासूनच इंदूरमधून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कैलास विजयवर्गी, मुनेर म्हणून तब्बल वीस वर्षांनी राज्याच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे. भाजपला बहुमत मिळाल्यास मध्य प्रदेश राज्याला नवा चेहरा मुख्यमंत्री दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT