Adv. Prakash Ambedkar esakal
Maharashtra Election 2025 Result

'एका म्यानात दोन तलवारी राहणार नाहीत, निवडणुकीत आम्ही ओबीसींबरोबर राहणार'; काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

Adv. Prakash Ambedkar : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या उपवर्गीकरण व क्रिमिलिअरचा निर्णय आम्हाला मान्य नाही.

सकाळ डिजिटल टीम

विधानसभा निवडणुकीत #ElectionWithSakal ओबीसी समूह (OBC Community) मराठ्यांना मतदान करणार नाही तर मराठा समूह हा ‘ओबीसीं’ना मतदान करणार नाही.

छत्रपती संभाजीनगर : ‘‘भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आरक्षण विरोधी असल्याने आता आरक्षणवाद्यांना ‘वंचित’शिवाय पर्याय राहिला नाही,’’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

विधानसभा निवडणुकीत #ElectionWithSakal ओबीसी समूह (OBC Community) मराठ्यांना मतदान करणार नाही तर मराठा समूह हा ‘ओबीसीं’ना मतदान करणार नाही. एका म्यानात दोन तलवारी राहणार नाहीत. मनोज जरांगे यांची मागणी ही ‘ओबीसी’ कोट्यातून आरक्षण मिळावे अशी आहे. पण ‘ओबीसीं’चा त्याला विरोध आहे.

त्यांचे म्हणणे कायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही या निवडणुकीत ‘ओबीसींबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या उपवर्गीकरण व क्रिमिलिअरचा निर्णय आम्हाला मान्य नाही, मुळात सर्वोच्च न्यायालयाला निर्णय देण्याचाच अधिकार नाही, असे ते म्हणाले.

हरियानाच्या निवडणुकीतून भाजप आणि काँग्रेसची साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील दलितांनी सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आता आम्हीही दलितांना सावधानतेचा इशारा देत आहोत.

-प्रकाश आंबेडकर, प्रमुख, वंचित बहुजन आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT