Islampur Assembly Elections 2024 sakal
Maharashtra Election 2025 Result

Islampur Assembly Elections 2024: महायुतीच्या जागावाटपात इस्लामपूर,शिराळा मतदारसंघ अजितदादांकडे ?

Islampur Vidhan Sabha Elections 2024: महायुतीच्या जागावाटपात इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

- शांताराम पाटील

इस्लामपूर: महायुतीच्या जागावाटपात इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या बैठकीनंतर राज्यातील महायुतीतील जागावाटपाचे संकेत राजकीय वर्तृळात चर्चेत आहेत.

सध्या या दोन्ही मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार असून शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व मानसिंगराव नाईक यांच्यासमोर आता कोणाचे आव्हान याची चर्चा आहे.

महायुतीच्या जागावाटपात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षानी जिथे ज्यांचा विद्यमान आमदार त्याला ती जागा असे धोरण निश्‍चित केले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या दोन्ही मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत कोणीही गेले नाही. दुसरीकडे आधीपासून इथे दोन्ही ठिकाणी भाजप व शिवसेना या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी तयारी केली आहे.

इस्लामपूरमधून शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार व गौरव नायकवडी तर भाजपकडून जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील पाच वर्षापासून लढण्यासाठी तयारीत आहेत. शिराळामधून भाजपकडून सम्राट महाडिक व सत्यजीत देशमुख यांनी तयारी केली आहे. आता या जागा अजित पवारांकडे जाणार असल्याने भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. त्यामुळे आता ते अपक्ष म्हणून महायुतीला धक्का देणार काही शिरुल लोकसभा मतदारसंघात जसे अढळराव पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून लढत दिली तसे इथेही होणार का याची उत्सुकता आहे.

या बाबत राज्य पातळीवरुनच संदेश दिला जाईल अशी माहिती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या हेवीवेट नेत्याने सांगितले. त्यामुळेभाजप राष्ट्रवादीतील इच्छुकांची बंडखोरी की राष्ट्रवादीत प्रवेश याची उत्सुकता सर्वांना असेल.

इच्‍छुकांपैकी गौरव नायकवडी म्हणाले,‘‘ इस्लामपूर मतदारसंघ हा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा आहे. त्यामुळे या ठिकाणाहुन मी निवडणूक लढवणार आहे. तरीही महायुतीमध्ये वरिष्ठ नेत्यांच्याकडून या मतदारसंघाबाबत काही निर्णय झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये पुढील निर्णय घेऊ

तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार म्हणाले,‘‘ या मतदारसंघात महायुतीकडून वेगळा निर्णय झाल्यास व ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यास त्यांचा उमेदवार कोण आहे व त्याने आजपर्यंत शिवसेनेला मदत केली आहे का हे पाहुनच आम्ही पाठिंब्याचा निर्णय घेऊ.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Odisha Assam Floods: ओडिशा-आसाममध्ये पावसाचा हाहाकार; ७८ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांचा जीव धोक्यात

CWG26 India Medal Tally : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने आतापर्यंत किती पदकं जिंकली? ऑस्ट्रेलिया शतकासह अव्वल, तर...

Latest Marathi News Live Update : राधानगरी धरण १०० टक्के भरले; स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता

Pune-Bengaluru Highway : सहा पदरीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह! मुरगूड रोडनंतर आता गांधी हॉस्पिटलजवळ राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची भिंत कोसळली

SCROLL FOR NEXT