cm ladki bahin yojna esakal
Maharashtra Election 2025 Result

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, सरकारचं पत्र मिळालं का? आचारसंहितेच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द; योजनांची होणार आखणी

vidhan sabha election 2024: या योजनेच्या माध्यमातून तुझ्यासाठी काही तरी करता आलं, हे समाधान भावापेक्षा आणि कोणाला असेल? आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत" बहीण-भाचांसाठी भावानं जमेल तेवढं योगदान द्यावं, कारण ते आशीर्वाद भावाचं आयुष्य वाढवतात असं म्हटलं जातं. पण केवळ तेच कारण नाही. माझं आयुष्यही तुला समर्पित आहे ताई तू सुखी व्हावीस हीच इच्छा आहे.

संतोष कानडे

CM Eknath shinde Letter: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एक भावनिक साद घालणारं पत्र पाठवण्यात आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश देण्यात आलेले असून शेवटच्या लाभार्थ्यांच्या घरी पत्र पाठवण्याचं यातून सांगण्यात आलेलं आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ‘लाडक्या बहिणींना’ सरकारने भावनिक साद घातली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची स्वाक्षरी असलेलं हे पत्र आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांना पत्र पाठविण्याचे आदेश राज्य सरकारकडून पाठविण्यात आलेले आहेत.

‘प्रिय ताई, या मदतीच्या मोबदल्यात मला काही नको, तुझा कष्टाळू हात माझ्या डोक्यावर असू दे’ असे आवाहन या पत्रातून ‘लाडक्या बहिणींना’ करण्यात आले आहे. पत्रामध्ये म्हटलं आहे की, या योजनेच्या बदल्यात मला काहीही नको आहे. तुझे हात बळकट व्हावेत, तुला आणि माझ्या भाच्यांना मदत व्हावी, यासाठी हा प्रयत्न आहे. त्यामुळे अनेक योजना आखण्यात येतील, असं आश्वासन पत्रामध्ये दिलं आहे.

सरकारचं पत्र जशास-तसं

राज्यातील तमाम भगिनींना

सप्रेम जय महाराष्ट्र

प्रिय ताई,

तुला माहितीच आहे, महायुती सरकारमधील तुझ्या भावाने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरू केली आहे. दरमहा तुझ्या बँक खात्यात थेट १५०० रुपये जमा होणार आहेत. म्हणजे वर्षाला १८,००० रुपये तुला मिळतील ताई.

आतापर्यंत तुझ्याप्रमाणेच राज्यातील १ कोटी १६ लाखांपेक्षा अधिक भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पण काम संपलेलं नाही. अडीच कोटी भगिनींना लाभ देण्याचा निर्धार तुझ्या या भावाने केला आहे. तुला देखील या योजनेतून लाभ मिळाला असेल. त्याबद्दल तुझे विशेष अभिनंदन... या योजनेच्या माध्यमातून तुझ्यासाठी काही तरी करता आलं, हे समाधान भावापेक्षा आणि कोणाला असेल? आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत" बहीण-भाचांसाठी भावानं जमेल तेवढं योगदान द्यावं, कारण ते आशीर्वाद भावाचं आयुष्य वाढवतात असं म्हटलं जातं. पण केवळ तेच कारण नाही. माझं आयुष्यही तुला समर्पित आहे ताई तू सुखी व्हावीस हीच इच्छा आहे.

तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला स्वावलंबी बनविण्यासाठी तुझ्या भावाचा हा प्रयत्न आहे. यापुढेही तुला असच स्वाभिमानानं, स्वतःच्या पायावर उभ राहता आलं पाहिजे, यासाठी तुझा हा भाऊ योजनांची आखणी करेल आणि त्यांची योग्य ती अंमलबजावणी देखील करेल, हा शब्द आहे.

किती करतेस तू कुटुंबासाठी.. किती तरी प्रकारच्या नात्यात तू खंबीर उभी असतेस. तुझ्यापाठी कोणीतरी उभं राहिलं पाहिजे का नको? तुझं आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार यांना बळ देण्यासाठीच तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी सदैव उभा असेल, अशी ग्वाही देतो आणि त्याबदल्यात मला काय हवं? काही नको! फक्त तुझा कष्टाळू कर्तबगार हात माझ्या डोक्यावर असू दे...

तुझा भाऊ

एकनाथ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री अदिती तटकरे यांच्या सह्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत हे पत्र लाभार्थी महिलांच्या घरी पाठवण्यात यावं, असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT