सायबर गुन्हेगारांची गाडी सुसाट..! sakal
Maharashtra Election 2025 Result

सायबर पोलिसांचा इशारा! फोटो, व्हिडिओ मॉर्फिंग करून प्रसारितही करु नका, नाहीतर ५ लाखांचा दंड अन्‌ ३ वर्षांची होईल शिक्षा; निवडणुकीमुळे सोशल मीडियावर विशेष लक्ष

नेत्यांचे फोटो मॉर्फिंग करून अनेकजण सोशल मीडियावर प्रसारित करतात. त्यांच्यावर त्या त्यावेळी कारवाई होतेच, पण आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अशा बाबींवर सायबर पोलिसांचा कटाक्ष आहे. तसे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांसह ते तयार करणाऱ्यास पाच लाख रुपयांचा दंड व तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

तात्या लांडगे

सोलापूर : नेत्यांचे फोटो मॉर्फिंग करून अनेकजण सोशल मीडियावर प्रसारित करतात. त्यांच्यावर त्या त्यावेळी कारवाई होतेच, पण आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अशा बाबींवर सायबर पोलिसांचा कटाक्ष आहे. तसे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांसह ते तयार करणाऱ्यास पाच लाख रुपयांचा दंड व तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे ग्रुप ॲडमिनने अशा बाबींकडे आवर्जून लक्ष देणे अपेक्षित असल्याचे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मेसेज, व्हिडिओ, फोटोंवर लक्ष ठेवण्यासाठी सोलापूर शहर सायबर पोलिसांनी एक हवालदार व चार अंमलदारांची टीम नेमली आहे. व्हॉट्‌सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, शेअरचॅट अशा ठिकाणी कोणी मूळ फोटो किंवा व्हिडिओमध्ये जाणूनबुजून छेडछाड केली व समोरच्याला त्यात छेडछाड झाल्याची माहिती असतानाही तो व्हिडिओ किंवा फोटो तसाच पुढे व्हायरल (प्रसारित) केल्यास दोघांनाही तेवढीच शिक्षा होईल, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.

अश्‍लील मजकूर इलेक्ट्रॉनिक रूपात तयार करून तो प्रसारित केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० प्रमाणे त्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाते. संशयित आरोपी अशाच प्रकारे कृत्य करत असल्यास त्याच्यावर भारतीय न्याय संहितेतील काही कलमांनुसार देखील कारवाई होते, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोशल मिडियावर विशेष लक्ष

मूळ फोटो किंवा व्हिडिओमध्ये छेडछाड करून तो सोशल मीडियावर प्रसारित करणे हाही गुन्हा आहे. अशा प्रकरणात तसा प्रकार करणाऱ्यासह तो प्रसारित करणाऱ्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल होतो. सध्या विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मेसेज, फोटो, व्हिडिओंवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष कर्मचारी नियुक्त केले आहेत.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सायबर), सोलापूर शहर

आयटी कलम-६७ नुसार कडक कारवाई

मूळ फोटो किंवा व्हिडिओमध्ये छेडछाड करून म्हणजेच मॉर्फिंग करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ नुसार व्हायरल करणाऱ्यासह छेडछाड करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होतो. त्या कलमानुसार संबंधितास पाच लाख रुपयांपर्यंत दंड व तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे व्हॉट्‌सॲप किंवा अन्य सोशल मीडियावरील फोटो, व्हिडिओ, मेसेजची खात्री केल्याशिवाय कोणीही प्रसारित किंवा प्रसिद्ध करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT