Hadgaon Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Election 2024 Result

Assembly Elections 2024: डॉ. रेखा चव्हाण यांना ‘सिग्नल’ कुणाचे ? चर्चेला उधाण; विधानसभा लढविण्याची तयारी सुरु..

Hadgaon Vidhan Sabha elections 2024 : हदगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याकरिता इच्छुक असलेल्या डॉ. रेखा चव्हाण यांना नेमके ‘सिग्नल’ कुणाचे ?

गजानन पाटील

हदगाव : तालुक्यातील गोर्लेगाव येथील रहिवासी तथा नांदेड शहरातील नेत्रतज्ञ डॉ. रेखा चव्हाण यांनी विधानसभा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याकरिता इच्छुक असलेल्या डॉ. रेखा चव्हाण यांना नेमके ‘सिग्नल’ कुणाचे? याबाबत मतदारसंघात चर्चा आहे.

काँग्रेस पक्षाकडून सक्षम उमेदवार म्हणून आपल्याच नावाला पक्षश्रेष्ठी प्रथम पसंती देतील, अशी अपेक्षा रेखा चव्हाण यांना आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण या काँग्रेसच्या धोरणानुसार महिलांची मतदारसंघातील शक्ती पाहून उमेदवारी देणार असल्याचे चव्हाण यांचे हितचिंतक सांगतात. यानिमित्त डॉ. रेखा चव्हाण यांचे मतदारसंघात दौरे सुरु असून मतदारांशी संवाद साधत आहे. त्यांनी यापूर्वी जिजाऊ ब्रिगेडच्या विविध पदांवर काम केले आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून संघटनांचे काम केले.

जवळगावकरांसमोर निभाव लागेल का ?

आमदार माधवराव जवळगावकर यांनी या मतदारसंघाचे दोनवेळा नेतृत्व केलेले आहे. २००४ पासून चारवेळा त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांना दोनवेळा यश आले, तर दोनवेळा अपयश. तरीही पक्षाने त्यांना चारवेळा संधी दिली, हेही नाकारून चालणार नाही. जवळगावकरांना उमेदवारीबाबत ‘ग्रीन सिग्नल’ मिळत आले. यावेळी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल, असे समर्थक ठामपणे सांगतात. त्यामुळे जवळगावकर यांच्यासमोर डॉ. रेखा चव्हाण यांचा पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यात निभाव लागणार का? असाही प्रश्न उपस्थित होतो.

मतदारसंघात जवळगावकरांची पकड मजबूत; जवळगावकरांचा पासपोर्ट

गेल्या तीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले जवळगावकर घराणे सर्व दूरपरिचित आहेत. कै. निवृत्तीराव जवळगावकर, कै. पंजाबराव जवळगावकर काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेले घराणे म्हणून मराठवाड्यात ओळख आहे. तसेच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले आमदार जवळगावकर यांना हदगाव मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे. मतदारसंघात त्यांची मोठी पकड आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्याच नावाला ग्रीन सिग्नल देतील, असे हितचिंतक सांगतात.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT