Prashant Jagtap esakal
Maharashtra Election 2025 Result

Hadapsar Assembly Election 2024 : हडपसरच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशांत जगताप यांना संधी द्या : वसंत मोरे

Hadapsar Vidhan Sabha Election 2024 : नागरिकांना मुबलक पाणी, चांगले रस्ते, सांडपाणी वाहिन्या, प्रदूषणमुक्त वातावरण, कोंडीमुक्त वाहतूक अशा सुविधा आजही मिळत नाही. परिस्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना विजयी करा

सकाळ वृत्तसेवा

हडपसर : ‘‘नागरिकांना मुबलक पाणी, चांगले रस्ते, सांडपाणी वाहिन्या, प्रदूषणमुक्त वातावरण, कोंडीमुक्त वाहतूक अशा सुविधा आजही मिळत नाही. परिस्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना विजयी करा,’’ असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी केले.

जगताप यांनी मंगळवारी मॉर्निंग वॉक करीत प्रचाराची सुरुवात केली. कात्रज उद्यान व तलावाजवळ नागरिकांसोबत संवाद साधला. विविध भागात घरोघरी जात मतदारांचा पाठिंबा मिळविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

हेही वाचा

जगताप हेच हडपसरचे आमदार होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कात्रज, कोंढवा, हांडेवाडी, सय्यदनगर परिसरात नागरिकांच्या घरी जाऊन जगताप यांनी गाठीभेटी घेतल्या. या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.

कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. युवकांची ताकद जगताप यांना देण्याचा निर्धार त्यांनी केला.

हेही वाचा

जगताप म्हणाले, ‘‘हडपसरच्या विकासाची दिशा घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे. शरद पवार यांच्यासारखा जाणता राजा आपल्यासोबत आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मला संधी द्या.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT