Harshwardhan Patil sakal
Maharashtra Election 2025 Result

Harshwardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचा इरादा पक्का! अंकिता पाटलांनी बदललं स्टेट्स; उद्या पत्रकार परिषदेत घोषणा?

शरद पवारांसोबत हर्षवर्धन पाटील काम करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळं इंदापुरातील राजकारण बदलणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार चर्चा सुरु होती, यासंदर्भात त्यांनी पवारांच्या गाठीभेटी देखील घेतल्या होत्या. पण आता या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. कारण हर्षवर्धन पाटलांच्या दोन्ही मुलांनी आपले व्हॉट्सअॅप स्टेटस बदलले आहेत.

हर्षवर्धन पाटील यांनी आज दुसऱ्यांदा घेतली शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील पुण्याच्या दिशेने रवाना झाले. आज पवारांची भेट घेतल्यानंतर उद्या हर्षवर्धन पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यासाठी उद्या सकाळी 10 वाजता हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही मुलांनी WhatsApp स्टेटसला तुतारी चिन्ह ठेवलं आहे. यामध्ये भाजपमध्ये पद असलेल्या अंकिता पाटील यांचाही समावेश आहे. यामुळं खरंतर हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीत जाण्याचा इरादा पक्का असल्याचं स्पष्ट होत आहे. पण उद्या ते अधिकृतरित्या काय भूमिका जाहीर करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT