Samarjit Ghatge vs Hasan Mushrif  esakal
Maharashtra Election 2025 Result

'खालच्या दर्जाची वक्तव्ये करून मुश्रीफांनी शाहू महाराज, आंबेडकरांचा अपमान केलाय'; समरजित घाटगेंचा निशाणा

Samarjit Ghatge vs Hasan Mushrif : ‘कागल, गडहिंग्लज-उत्तूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे.'

सकाळ डिजिटल टीम

घाटगे म्हणाले, ‘मुश्रीफ यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने काय आदर्श घ्यायचा? शाहूंच्या कागलची ही बदनामी नव्हे का?

कोल्हापूर : ‘कागल, गडहिंग्लज-उत्तूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या नेतृत्वास पुढे आणून पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला. अशा या कागलचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय वक्तव्य करून राजर्षी शाहू यांच्यासह डॉ. आंबेडकर व जनतेचाही अपमान करीत असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांनी पत्रकार परिषदेत दिले.

दरम्यान, मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या या असंविधानिक भाषेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. त्याबद्दल त्यांनी माझी नव्हे कागल, गडहिंग्लज व उत्तुरकारांची माफी मागावी, अशी मागणीही घाटगे यांनी केली. गडहिंग्लज येथे झालेल्या कार्यक्रमात मुश्रीफ यांनी घाटगे यांच्याबाबत अपशब्द वापरला. त्याला घाटगे यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. #ElectionWithSakal

घाटगे म्हणाले, ‘मुश्रीफ यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने काय आदर्श घ्यायचा? शाहूंच्या कागलची ही बदनामी नव्हे का? कागल, गडहिंग्लज-उत्तूर विभागामध्ये दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे, सदाशिवराव मंडलिक, श्रीपतराव शिंदे, बाबासाहेब कुपेकर, आप्पासाहेब नलवडे यांच्यामध्ये टोकाचे मतभेद झाले. पण, त्यांनी कधी अशी पातळी सोडली नाही. याच राजघराण्याने त्यांना राजकारणात आणले हे ते विसरले का?’

‘मला तर वाटते, अशा प्रकारे बदनामीचा त्यांनी ठेकाच घेतला आहे,’ असे सांगून घाटगे म्हणाले, ‘त्यांची पार्टी आता चार कॉन्ट्रॅक्टरांची पार्टी झाली आहे. माझ्याकडूनसुद्धा त्यांच्याप्रमाणे अशाच असंविधानिक शब्दांचा वापर व्हावा, अशी त्यांची अपेक्षा असेल. मात्र, मी माझी पातळी सोडणार नाही.’ बदल्यांसंदर्भातील आरोपाबाबत ते म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या कार्यक्रमाला आलेच नाहीत. ते जेव्हा केव्हा येतील तेव्हा याबाबतीत त्यांना आपण जरूर विचारा. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या परिवर्तनाची सुरुवात कागलमधून होईल.’

स्वतःच आरोपी असल्याचे सिद्ध

‘मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या शेअर्सचे ४० कोटी रुपये त्यांनी खाल्ल्याचा आरोप मी केला आहे. त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्याआधीच ते शरद पवार यांना सोडून दुसऱ्या बाजूला गेले. न्यायप्रविष्ठ बाब असताना तुरुंगवास वगैरे या पुढच्या गोष्टी आहेत. पुढे काय होईल हे माहित नाही. मात्र, त्यांनी पाठीमागील दाराने पळून जाऊन आरोपी असल्याचे स्वतः सिद्ध केल्याचे घाटगे यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांच्या कोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! महिला वकीलाच्या कृतीमुळे कोर्ट मार्शलला बोलवावं लागलं; पुढचा घटनाक्रम धक्कादायक!

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट ओसरली, मात्र गारठा कायम राहणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान?

Swami Samarth Video: स्वामी समर्थ महाराजांचा गूढ प्रवास! भारत खंडातून फिरताना तयार होतो 'ॐ' आकार... प्रत्येक भक्ताने वाचावी अशी माहिती

Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आज दिल्लीत होणार आगमन ; दौऱ्याकडे जगाचे असणार बारीक लक्ष!

आजचे राशिभविष्य - 04 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT