Kolhapur Assembly Election esakal
Maharashtra Election 2024 Result

Kolhapur Election : काँग्रेसच्या वाट्याला दहापैकी 'इतक्या' जागा; ठाकरे, शरद पवार गटाला प्रत्येकी दोन जागा मिळणार!

Kolhapur Assembly Election : जिल्ह्यात विधानसभेचे #ElectionWithSakal दहा मतदारसंघ आहेत. यापैकी चार मतदारसंघांत काँग्रेसचे (Congress) विद्यमान आमदार आहेत.

निवास चौगले

‘महाविकास’मध्ये विद्यमान आमदार असल्याच्या जोरावर ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, असे काँग्रेस नेतृत्वाने ठरवले आहे.

कोल्हापूर : ‘ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, त्याच पक्षाला ती जागा,’ या सूत्रानुसार काँग्रेसला विद्यमान आमदार असलेल्या चार जागांसह ‘शिरोळ’ व ‘इचलकरंजी’ या दोन जागांचा बोनस मिळण्याची शक्यता आहे. ‘कोल्हापूर उत्तर’साठी आग्रह धरललेल्या शिवसेना ठाकरे गटाला दोन, तर राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाला दोन, असे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) संभाव्य जागा वाटप निश्‍चित झाले आहे.

जिल्ह्यात विधानसभेचे #ElectionWithSakal दहा मतदारसंघ आहेत. यापैकी चार मतदारसंघांत काँग्रेसचे (Congress) विद्यमान आमदार आहेत, तर ‘महाविकास’मधील ठाकरे गट व शरद पवार गटाकडे सध्या एकही विद्यमान आमदार नाही. २०१९ च्या निवडणुकीत विजयी झालेले ठाकरे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर हे शिवसेना शिंदे गटासमवेत, तर कागलचे आमदार पालकमंत्री हसन मुश्रीफ व चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत आहेत. याव्यतिरिक्त आमदार डॉ. विनय कोरे, प्रकाश आवाडे व राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष असले, तरी सध्या ते महायुतीसमवेत आहेत.

महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही ‘कोल्हापूर उत्तर’वरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ‘उत्तर’ची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, असा आग्रह स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आहे, त्याचप्रमाणे महायुतीतही या जागेसाठी शिवसेना शिंदे गट आक्रमक बनला आहे. शहरातील दोन्ही जागा भाजपला मिळणार नाहीत, अशी अटकळ असलेल्या भाजप नेतृत्वानेही ‘उत्तर’ शिंदे सेनेला सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

‘महाविकास’मध्ये विद्यमान आमदार असल्याच्या जोरावर ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, असे काँग्रेस नेतृत्वाने ठरवले आहे. त्यामुळेच ही जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. ‘उत्तर’सह विद्यमान आमदार असलेल्या ‘करवीर’, ‘कोल्हापूर दक्षिण’ व ‘हातकणंगले’ या जागाही काँग्रेसला मिळतील. ‘इचलकरंजी’ व ‘शिरोळ’मध्ये राष्ट्रवादी शरद पवार असो किंवा शिवसेना ठाकरे गटाकडे प्रबळ उमेदवारच नाही, त्यामुळे या दोन जागांचा बोनसही काँग्रेसला मिळणार आहे.

‘चंदगड’ व ‘कागल’ या दोन्ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला हे जवळपास निश्‍चित आहे. त्याचप्रमाणे ‘शाहूवाडी’ व ‘राधानगरी’ या दोन जागा शिवसेना ठाकरे गटाला जातील. ‘राधानगरी’ व ‘उत्तर’ सोडल्यास अन्य मतदारसंघांतील लढतीही निश्‍चित आहेत. ‘उत्तर’चा आघाडीचा उमेदवार कोण असेल, त्यावर महायुतीचा या मतदारसंघातील उमेदवार ठरणार आहे.

...असे असेल आघाडीचे जागा वाटप

  • काँग्रेस - कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी

  • शिवसेना ठाकरे गट - शाहूवाडी, राधानगरी

  • राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - कागल, चंदगड

'उत्तर'मधून सरप्राईज चेहरा

‘कोल्हापूर उत्तर’मधून काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. मात्र ‘इलेक्टिव्ह मेरिट’च्या पातळीवर ऐनवेळी रिंगणात ‘सरप्राईज’ चेहरा उतरला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेप्रमाणेच या मतदार संघातील संभाव्य उमेदवाराचा निर्णय मंगळवारी (ता. १५) होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT