nitin gadkari  sakal
Maharashtra Election 2025 Result

Marathwada Assembly Election : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे काम तडीस नेणार : नितीन गडकरी

संभाजी पाटील निलंगेकर हे कार्यसम्राट आमदार आहेत. एक प्रभावी आमदार अशी त्यांची ओळख आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने आमदार करा, त्यांना मंत्री करण्याची हमी मी घेतो, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

देवणी : संभाजी पाटील निलंगेकर हे कार्यसम्राट आमदार आहेत. ते युवा असून त्यांच्याकडे काम करण्याची अफाट शक्ती आहे. एक प्रभावी आमदार अशी त्यांची ओळख आहे. त्यांना प्रचंड मताधिक्याने आमदार करा, त्यांना मंत्री करण्याची हमी मी घेतो, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

दरम्यान, लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम झाले आहे. आता हा रेल्वेमार्ग मी तडीस नेणार आहे, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.

निलंगा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ देवणी येथे मंगळवारी (ता. १२) झालेल्या जन स्वाभिमान सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले, की संभाजी पाटील निलंगेकर हे स्वतःच्या ताकदीवर जिल्ह्याच्या व मतदारसंघाच्या समस्या सोडविणारे प्रभावी आमदार आहेत.

ग्रामीण क्षेत्र विकासामध्ये आमदार निलंगेकर यांचे काम मोठे आहे. रूपाताई निलंगेकर यांनीही लोकसभेत प्रतिनिधित्व करताना विविध प्रश्न मांडून त्यांची सोडवणूक करून घेतली. लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हलविण्यास विरोध असताना आमदार निलंगेकर शिष्टमंडळ घेऊन माझ्याकडे आले होते. हा पुतळा न हलविण्याच्या सूचना त्यांच्यामुळेच आपण दिल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

विविध मागण्यांवर गडकरी सकारात्मक

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यात लक्ष घालावे. देवणी गोवंशाचे संवर्धन व्हावे; तसेच हंचनाळ ते धनेगाव व राणी अंकुलगा येथील पुलांना मंजुरी देण्याची मागणी आमदार निलंगेकर यांनी यावेळी केली. यावर विविध मागण्यांबाबत गडकरी यांनी सकात्मकता दाखविली. हे प्रश्नही सोडवले जातील, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

SCROLL FOR NEXT