Rahul Kul vs Ramesh Thorat:  Esakal
Maharashtra Election 2024 Result

Daund Assembly Election: दौंड विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार कडवी लढत; कुल की थोरात, कोण मारणार बाजी

Rahul Kul vs Ramesh Thorat: अनियमितता आणि अशुद्धतेमुळे ८० टक्के गावांत पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. मुळशीचे पाणी आणण्याचे आश्‍वासन, पण आहे त्या कालव्यांची गळती थांबलेली नाही.

आशुतोष मसगौंडे, सकाळ वृत्तसेवा

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांचा निसटता विजय झाला होता. रमेश थोरात यांच्याकडून कडवी लढत. आमदारांचे विकासकामांचे आकडे कोट्यवधी रुपयांमध्ये; पण भरीव कामे नाहीत. अनियमितता आणि अशुद्धतेमुळे ८० टक्के गावांत पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. मुळशीचे पाणी आणण्याचे आश्‍वासन, पण आहे त्या कालव्यांची गळती थांबलेली नाही.

अशी आहे स्थिती :
१. भाजपकडून विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
२. भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे इच्छुक
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जागावाटपात मतदारसंघाची मागणी.
४. राष्ट्रवादीकडून वीरधवल जगदाळे व वैशाली नागवडे इच्छुक.
५. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जागा लढविणार
६. नामदेव ताकवणे व अप्पासाहेब पवार इच्छुक
७. महिला किंवा नव्या चेहऱ्यास उमेदवारी मिळण्याची शक्यता
८. रमेश थोरात अपक्ष वा पुरस्कृत उमेदवार राहण्याची शक्यता
९. ओबीसी व तिसऱ्या आघाडीची भूमिका महत्त्वाची राहणार

निवडणूक मुद्दे

दौंड तालुक्यात शैक्षणिक संकुल नाही. बेरोजगारी पर्यायाने व्यसनाधीनता व गुन्हेगारीतही वाढ. कुरकुंभ एमआयडीसीत भूमिपुत्रांना नोकरी नाही. औद्योगिक पट्ट्यातील ठेकेदारीत गुन्हेगारी टोळ्यांचा शिरकाव. युवा वर्गाला शिक्षण व नोकरीसाठी दररोज पुणे येथे जावे लागत आहे. भौगोलिक परिस्थिती व दळणवळण सुसह्य असताना नियोजन नाही. कुरकुंभ एमआयडीसीमुळे वायू व जल प्रदूषण. भीमा पाटस कारखान्याचे खासगीकरण. दौंड शहरातील नगरपालिकेच्या अडीच कोटी रुपयांच्या कत्तलखान्याला वाढता विरोध.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT