Leaders of the Mahayuti alliance discussing seat-sharing strategies for the Maharashtra Assembly Election 2024. Esakal
Maharashtra Election 2024 Result

Assembly Election 2024: विधानसभेसाठी काय आहे भाजपचा फॉर्म्युला, जो एकनाथ शिंदे करताहेत अमान्य

CM Eknath Shinde: शिंदे यांनी ते जिंकू शकणाऱ्या मतदारसंघांची यादी पुन्हा एकदा सादर केली असून किमान ९० ते ९५ जागा आम्हाला मिळायला हव्यात आणि राज्यातील वातावरणही आम्हाला अनुकूल आहे, असे सांगितले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

सकाळ न्यूज नेटवर्क, मुंबई: भाजपने पुढे केलेल्या १६०, ८० आणि ५० चा फॉर्म्युला सहकारी पक्षांना अमान्य असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९० जागांच्या मागणीवर कमालीचे आग्रही आहेत. ४० जागांवरचा तिढा कायम असून, तो सोडविण्यासाठी गुरुवारी (ता. १७) अमित शहा बैठक घेतील. तोपर्यंत युतीचे जागावाटप जाहीर होणार नाही, असे विश्वसनीयरीत्या समजते.

या संदर्भात आज रात्री उशिरापर्यंत दिल्लीत सुरू असलेल्या चर्चेत शिंदे गट ९० वर, तर अजितदादा गट ५५ वर ठाम होता. भाजपने शिंदे गटाला ८४ जागा द्यायची तयारी दाखविल्याचेही सांगितले होते, तसे झाले तर भाजपला १५५ जागांवर समाधान मानावे लागेल. (Maharashtra Assembly Election 2024 seat-sharing Mahayuti alliance)

शिंदे यांनी ते जिंकू शकणाऱ्या मतदारसंघांची यादी पुन्हा एकदा सादर केली असून किमान ९० ते ९५ जागा आम्हाला मिळायला हव्यात आणि राज्यातील वातावरणही आम्हाला अनुकूल आहे, असे सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने किमान ६० जागा हव्यात, अशी मागणी पुढे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात फारशी अनुकूलता नसली तरी त्यांना पन्नास जागा द्यायला हव्यात, असे कुठेतरी भाजपने अंतर्गत बैठकांत मान्य केले असल्याचे एका विश्वसनीय सूत्राने सांगितले. मात्र या संबंधात जी चर्चा होणार असेल ती येत्या आठवड्याभरात सुरू राहील सांगण्यात आले.

'मविआ म्हणजे नापास होणारे विद्यार्थी'

नागपूर : "आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे विश्लेषण आणि तयारीच्या अनुषंगाने दिल्लीत भाजपच्या बैठका होत राहतील. मात्र, महाविकास आघाडीने वाट लावण्याचे काम मध्यंतरी केले. कारण सांगून अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी म्हणजे महाविकास आघाडी आहे," असा टोला लगावत वने, सांस्कृतिक कार्यक्रम मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'मविआ'वर तोफ डागली आहे. ते म्हणाले, "महायुती सरकार आणण्यासाठी ताकदीने जागा लढविता येईल, त्या संदर्भात निर्णय होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सूक्ष्म नियोजन असते."

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT