BJP Assembly Candidate ESakal
Maharashtra Election 2024 Result

BJP Assembly Candidate: भाजपच्या पहिल्या यादीत फडणवीसांसह '99' शिलेदाराचं 'कमळ' निश्चित

BJP Assembly Elections Candidate Announced: २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Vrushal Karmarkar

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून ९९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कामठीमधून वर्णी लागली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी दिली आहे. तर पहिल्या यादीत जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार, भोकरमधून श्रीजया अशोक चव्हाण, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, कुलाब्यातून राहुल नार्वेकर, साताऱ्यातून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्ष (भाजप), शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या २८८ सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गटही त्यांच्या याद्या लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.

शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए आघाडीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. ही बैठक पहाटे २ वाजेपर्यंत चालली आणि त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. तिन्ही पक्षांनी यापूर्वी २४० जागांवर एकमत केले होते, परंतु उर्वरित ४८ जागांसाठी चर्चा सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 176 अंकांनी घसरणीसह बंद; मेटल आणि आयटीमध्ये जोरदार विक्री, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराह IN, मग कोण OUT? लॉर्ड्स कसोटीसाठी इरफान पठाणने निवडली Playing XI; अशीच असेल टीम इंडिया

EMI Debt Trap: मध्यमवर्ग ईएमआयच्या जाळ्यात; 5 पैकी 3 लोकांवर तीनपेक्षा जास्त कर्ज, काय आहे कारण?

Latest Maharashtra News Live Updates: पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात: एसडीआरएफ आणि एनडीआरए यंत्रणा सज्ज

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

SCROLL FOR NEXT