Maharashtra Vidhan Sabha Election 2024 
Maharashtra Election 2024 Result

Vidhan Sabha Election 2024: सुमारे 100 जागांसाठी तब्बल 1,688 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसचा भाव वधारला

लोकसभा निवडणुकीत रेकॉर्डब्रेक कामगिरी केल्यानं राज्यात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : लोकसभा निवडणुकीत रेकॉर्डब्रेक कामगिरी केल्यानं राज्यात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांकडून तिकीटांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत असल्यानं काँग्रेस साधारण १०० जागा लढवेल असं बोललं जात आहे. मात्र, तब्बल १,६८८ इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज केले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. पाच तासापासून ही बैठक सुरू होती. या बैठीकाला काँग्रेस, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात जागावाटप जाहीर होईल, अशी चर्चा झाल्याचं कळतं आहे. तसंच आज आणि उद्या देखील यासंदर्भात मॅरेथॉन बैठक होणार आहे.

दरम्यान, मविआच्या या तयारीत काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज काग्रेसनं मागवले आहेत. तसंच या आर्जांवर कार्यवाही करण्यासाठी आणि इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची तयारी देखील काँग्रेसनं पूर्ण केली आहे. यासंदर्भातील एक यादीच काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाचही रिजनमधील मुलाखती घेणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

त्यानुसार, उद्यापासून अर्थात १ ॲाक्टोबर पासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार आहेत. उमेदवारांच्या मुलाखतीसाठी काँग्रेसनं नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. १ ते ८ ॲाक्टोबरपर्यंत नेते त्यांना ठरवून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेणार आहेत. तसंच मुलाखती पार पडल्यानंतर हे नेते १० ऑक्टोबरपर्यंत आपला गुप्त अहवाल प्रदेश काँग्रेसकडं सुपूर्द करतील. Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Marathi News

1688 इच्छुकांनी मागितली उमेदवारी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १,६८८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या इच्छुकांच्या मुलाखतींची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अमित देशमुख, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, वसंत पुरके, नाना गावंडे या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT