Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis  esakal
Maharashtra Election 2025 Result

Manoj Jarange: “आता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”; निवडणूक जाहीर होताच जरांगेंचं फडणवीसांना थेट आव्हान

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. त्यामुळं तात्काळ आचारसंहिता देखील लागू राहिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जालना : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. त्यामुळं तात्काळ आचारसंहिता देखील लागू राहिली आहे. पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाचे आंदोलक जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे. आता तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

निवडणूक जाहीर होताच जरांगेंनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला आवाहन केलं की, मराठ्यांनी १०० टक्के मतदान करावं, एकही मतदान वाया जाता कमा नये. कारण आता अशी वेळच आली आहे. त्यांना (भाजप) आपल्याला संपवायचं आहे. विधासभेसाठी आता वेगानं आपल्याला ताकद दाखवायची आहे. #ElectionWithSakal

जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन

मागण्या मान्य करायच्या की नाही हे तुमच्या हातात होतं कारण तुम्ही सत्तेत होतात. पण आता मतं द्यायची की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. आमची लेकरं भिकारी बनवण्यासाठी मी सर्व शक्ती  लावली. आमची लेकरं सत्तेत बसली नाही पाहिजेत यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला. पण आता तुम्हाला खुर्तीवर बसून द्यायचं की नाही हे मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसत नाही आणि आताही बसत नाही. त्यांच्या १७ पिढ्या आल्या तरी या महाराष्ट्रात मराठ्यांना बाजुला ठेवून ते कधीच सत्तेत येऊ शकत नाही.

कारण इथं प्रश्न नुसता मराठ्यांचा नाही. इथं प्रश्न मुस्लिमांचा गोरगरीब दलितांचा आहे. विशेष म्हणजे इथं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तसंच इथं अठरापगड जातीचे लोक आहेत इथं गोरगरीब ओबीसींचा, धनगरांचा प्रश्न आहे.

मराठ्यांचं १०० टक्के मतदान झालं पाहिजे - जरांगे

माझी हात जोडून मराठ्यांना विनंती आहे की आता आपल्या समाजाला तुम्ही बळ आणि शक्ती द्यायचं काम करा. आत्तापर्यंत तुम्ही सभेला जाऊन करोडोची ताकद दाखवली. यावेळी १०० टक्के मराठ्यांचं मतदान झालं पाहिजे. एकाही मराठ्याचं मतदान घरी राहता कामा नये, एकही मतदान वाया जाता कामा नये, कारण शेवटी अस्तित्वाची लढाई तुमच्या मुलांची आहे, अशा शब्दांत मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलं आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT