Amit Thackeray  
Maharashtra Election 2024 Result

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

विधानसभा निवडणुका आता कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

विधानसभा निवडणुका आता कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचं जागा वाटपांचं आणि उमेदवार निश्चितीचं काम वेगानं सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेनं देखील स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चाही आहे. पण ते कुठल्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण मनसेच्या नेत्यांनी त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला आहे.

वरळीतून मनसेचा फायरब्रँड नेता लढणार

अमित ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु होती. या मतदारसंघातील विद्यमान आमदार आदित्य ठाकरे आहेत. त्यामुळं यंदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना बघायला मिळेल अशी चर्चा सुरु झाली होती. पण या वरळी मतदारसंघातून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मनसेच्या गोटातून याबाबत दोन दिवसांपूर्वीच याचे संकेत देण्यात आले आहेत.

संदीप देशपांडे यांच्या प्रचाराचा नारळ स्वतः राज ठाकरेंच फोडणार आहेत. २१ सप्टेंबर रोजी संदीप देशपांडे यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमातच संदीप देशपांडे यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

अमित ठाकरेंसाठी शोधला सुरक्षित मतदारसंघ

दरम्यान, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचं जवळपास निश्चितच झाल्यानं आता मनसेच्या नेत्यांनी त्यांच्यासाठी दुसरी सुरक्षित मतदारसंघ शोधला आहे. त्यानुसार, अमित ठाकरेंनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी अमित ठाकरे आणि पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना देखील पत्र लिहिलं आहे.

यासंदर्भातील बॅनर देखील नाशिकमध्ये लागले आहेत. "राजसाहेब आदेश द्या अमित साहेब नाशिक पूर्व लढा"अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील निमानी परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT