Ramtek Vidhan Sabha Elections 2024 sakal
Maharashtra Election 2025 Result

Ramtek Assembly Elections 2024: कॉंग्रेसचेही राजकीय सर्वेक्षण; मतदार संघाचा घेतला आढावा..

Ramtek Vidhan Sabha Elections 2024: दिल्लीतील एका नामांकित सरकारी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मतदीने हे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती आहे.

नीलेश डोये

नागपूर: लोकसभानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झालेत. सर्वेक्षणाच्या माध्यमातून मतदार संघाचा आढावा घेण्यात येत असून कॉंग्रेसकडून नुकतेच जिल्ह्यातील सहाही मतदार संघाची माहिती जाणून घेतली. तिकीट वापटच्या वेळी या सर्वेक्षणाचा आधार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीतील एका नामांकित सरकारी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मतदीने हे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने केलेल्या सर्वेक्षणावरून चांगलाच वादंग उठला होता. मित्रपक्षांसोबत पक्षातीलच नेत्यांचे तिकिट कापण्यासाठी या सर्वेक्षणाचा वापर करण्यात आल्याची टीका भाजपवर झाली होती. रामटेक लोकसभासह विदर्भातील काही मतदार संघातील विद्यमान खासदारांची तिकीट कापून त्याऐवजी दुसऱ्यास तिकीट देण्यात आली.

विशेष म्हणजे भाजपने या सर्वेक्षणाचा आधार मित्र पक्षांचे उमेदवार निश्चित करण्यासाठीही घेतला होता. याचा फायदा होण्याऐवजी भाजपला नुकसान झाले. विधानसभा निवडणुकीपूर्वीही भाजपकडून सर्वेक्षण करण्यात आल्याची चर्चा होता आहे.

दुसरीकडे कॉंग्रेसही सर्वेक्षणाचा आधार घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांच्याकडूनही सर्वेक्षण करण्यात येत आले. दिल्लीतील एका मोठ्या नामांकित विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मदतीने हे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील सहाही मतदार संघात या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राजकीय परिस्थितीची चाचपणी करण्यात आली.

मतदार संघात कोणत्या नेत्याची चर्चा आहे, कुणासाठी वातावरण पोषक आहे, कोणते मुद्दे प्रभावी ठरतील, याची माहिती या सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेण्यात आली. निवडणुकीत तिकीट निश्चित करताना याचा आधार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात याचा खरंच किती वापर होतो, हे तिकीट वाटपानंतरच स्पष्ट होईल.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Prices in Kolhapur : ऐन लग्नसराईत सोने-चांदी दरात तेजी सुरूच; एका दिवसात 'इतक्या' हजारांनी वाढला दर, आणखी वाढ होण्याची शक्यता!

Latest Marathi News Live Update: पुण्यात पुन्हा बिबट्या? बावधन खुर्दमध्ये बिबट्याचं दर्शन

Leopard Attack : काळजात धस्स! अचानक बिबट्या समोर आल्यास घाबरू नका, 'हे' शास्त्रशुद्ध उपाय करा

Team India: मोठा ट्वीस्ट येणार? BCCI ने दुसऱ्या वनडेआधी बोलावली मिटिंग, गंभीर-आगरकरही राहणार उपस्थित

Varanasi News : वाराणसीत लखनऊ महामार्गावर सिक्स-लेन बोगद्याचे बांधकाम सुरू; खालून गाड्या, तर वरून धावणार विमान!

SCROLL FOR NEXT