जत: दुष्काळी फोरमच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात निर्णयाक भूमिका बजावणारे माजी आमदार विलासराव जगताप यांचे नाव चर्चेत राहिले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी अचानक त्यांच्या निवास्थानी भेट दिली.
दोन्ही नेत्यांत तब्बल एक तास चर्चा झाली. चर्चेचा विषय समजू शकला नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले. दुष्काळी फोरमचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख व माजी आमदार जगताप यांच्यात बैठक झाली होती.
त्यानंतर लगेचच आर. आर. आबा यांचे सुपुत्र रोहित यांनी बुधवारी सकाळी जगताप यांच्या घरी भेट दिली. तासभर चर्चा केली. रोहित यांच्या दौऱ्याची कल्पना स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना नव्हती.
रोहित व जगताप यांच्यात तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी मदत करावी, अशी विनंती रोहित यांनी केल्याचे समजते.
माजी मंत्री घोरपडे यांच्याशी जगताप यांचे सख्य आहे. जगताप यांनी पुढाकार घ्यावा, अशी चर्चा झाल्याचे बोलले जाते. जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, रोहित राजकीय कामासाठी नाही तर खासगी कामासाठी आले होते. तासभर चर्चा झाली. राजकीय काही नव्हते, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.