Aheri Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Election 2025 Result

Assembly Elections 2024: पिता-पुत्रीमधील बेबनाव हा निव्वळ फार्स : विजय वडेट्टीवार

Aheri Vidhan Sabha elections 2024: पिता-पुत्रीमधील बेबनाव हा निव्वळ फार्स आहे. हे लोक खोकेबाज आणि धोकेबाजही आहेत, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

अहेरी: राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांच्या मुलीत राजकीय बेबनाव दाखवून घरातच सत्ता राखण्याचा डाव आहे. म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राची सत्ता राजघराण्याकडेच राहावी, यासाठी धर्मरावबाबा, भाग्यश्री आत्राम आणि अम्ब्रीशराव आत्राम यांची धडपड सुरू आहे.

पिता-पुत्रीमधील बेबनाव हा निव्वळ फार्स आहे. हे लोक खोकेबाज आणि धोकेबाजही आहेत, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

अहेरी येथे रविवार (ता. २९) आयोजित काँग्रेस मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अॅड. कविता मोहरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार आदी उपस्थित होते. अजित पवार आलापल्लीत आले असताना जाहीर सभेत धर्मरावबाबांनी मुलगी भाग्यश्री आत्राम आणि जावयाला नदीत बुडवायचे आवाहन मतदारांना केले.

त्यावर त्यांच्या मुलीने वाघीण असल्याचे सांगत वडील धर्मरावबाबांना आव्हान दिले त्याबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, 'तू मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे करतो, असा हा प्रकार आहे.

लोकसभा निवडणुकीत एक काका, पुतण्या आणि मुलगी सर्वच एका बाजूला असताना काँग्रेसला अहेरी विधानसभा क्षेत्रात १२ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यावरून या भागात काँग्रेस किती मजबूत आहे हे स्पष्ट दिसले. मागील ४० वर्षांपासून अहेरीची सत्ता आलटून पालटून राजघराण्याच्या ताब्यात असतानाही या क्षेत्राचा विकास झाला नाही.

"सकाळ" च्या भाकिताची चर्चा...

अहेरी विधानसभेवर काँग्रेसच प्रबळ दावेदार असून ही जागा काँग्रेसच्या पारड्यातच पाडू अन्यथा मैत्रीपूर्ण लढत नक्की देऊ, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे "सकाळ" वृत्तपत्राने या आधीच महायुती आणि महाआघाडी यांच्यात उमेदवारांमध्ये दोन्ही बाजूने मैत्रीपूर्ण लढत होण्याचे भाकीत वर्तविले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT