Ratnagiri Assembly Election 2024 esakal
Maharashtra Election 2025 Result

Ratnagiri Election : आयारामांना उमेदवारी दिल्यास राजीनामे देणार; ठाकरे गटाच्या निष्ठावंतांनी ठणकावलं

Ratnagiri Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळणार हे निश्चित आहे.

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीआधी अन्य पक्षांतून काही पदाधिकारी येणार असल्याचे संकेत दिले; मात्र यामुळे निष्ठावंत शिवसैनिक चलबिचल झाला आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा (Ratnagiri Assembly) मतदारसंघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून निष्ठावंतांऐवजी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यास विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आदी पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. पक्षाकडून उमेदवाराची घोषणा केल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे निष्ठावंत पदाधिकाऱ्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हे स्पष्ट केले.

शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे विभाजन झाले. अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी ठाकरेंना पाठिंबा दिला, तर अन्य एक गट बाहेर पडून दुसरी शिवसेना स्थापन केली. मागील अडीच वर्षांमध्ये या विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री व आमदार म्हणून कार्यरत असणारे उदय सामंत यांच्या विरोधात उभे राहून अनेक ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने भगवा फडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. #ElectionWithSakal

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळणार हे निश्चित आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या असून, ठाकरे गटाकडून सध्या उदय बने आणि राजू महाडिक यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. निवडणुकीआधी अन्य पक्षांतून काही पदाधिकारी येणार असल्याचे संकेत दिले; मात्र यामुळे निष्ठावंत शिवसैनिक चलबिचल झाला आहे. बाहेरून येणाऱ्यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.

याबाबत वरिष्ठ पातळीवरूनही स्थानिक पदाधिकाऱ्‍यांना विचारणा करण्यात आली होती; मात्र याला स्थानिक पदाधिकाऱ्‍यांनी विरोध केला आहे. वरिष्ठांकडे निष्ठावंतांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. निष्ठावंतांना उमेदवारी दिल्यास जीवाची बाजी लावून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांनी सांगितले आहे; परंतु अन्य पक्षांतून येऊन त्याला उमेदवारी दिली गेल्यास मात्र उपजिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांनी राजीनामे देऊन तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजीनाम्याच्या निर्णयावर अंमल केला जाईल, असे निष्ठावंतांनी स्पष्ट केले.

शिवसैनिक अस्वस्थ

काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी अन्य पक्षांत जाण्याचे सूतोवाच केले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे गटात जाण्याचे संकेत दिले; परंतु त्यांचा प्रवेश होणार असल्याच्या शक्यतेने निष्ठावंत शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ होते. त्यांनी प्रवेश द्या; परंतु उमेदवारी नको, असे स्पष्ट केले होते. तरी त्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा असल्याने निष्ठावंतांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Development Package : मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीतील कोटींची उड्डाणे हवेतच! धक्कादायक आकडेवारी समोर

Satej Patil Hasan Mushrif : 'हसन मुश्रीफ हतबल, महायुतीत आताच डोकीफुटत आहेत'; सतेज पाटील यांची टीका, गोकुळ निवडणुकीवरून राजकारण तापलं

Raju Shetti: १५ ऑक्टोबरला कारखान्यांची धुराडी पेटल्यास संघर्ष; राजू शेट्टींचा इशारा, हुबळीत केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

४० पैशांनी जीव जाणार नाही, प्रत्येक गोष्टीवर कर दिला पाहिजे; UPI शुल्कावर नीति आयोगाच्या उपाध्यक्षांचं विधान, सांगितली चाणक्यनीति

Kagal Municipal Council : कागल नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; हसन मुश्रीफ, समरजित घाटगेंच्या कारभारावर सवाल, कर्मचाऱ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT