RSS And BJP leaders strategizing for a successful campaign in the Maharashtra Assembly Election 2024. Esakal
Maharashtra Election 2024 Result

Maharashtra Vidhansabha Election: विधानसभेला भाजपसाठी 'RSS'कडून प्लॅन! संघाच्या 6 गोष्टी महायुती सरकारला वाचवणार का?

Maharashtra Assembly Election RSS And BJP: लोकसभेतील या निराशाजनक कामगिरीनंतर विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा सक्रियपणे मैदानात उतरला आहे.

आशुतोष मसगौंडे

RSS And BJP strategies for Maharashtra Assembly Election 2024:

येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान लोकसभेत बसलेल्या फटक्यातून सावरण्यासाठी भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून आला आहे.

विधानसभेत पुन्हा एकदा यश मिळवण्यासाठी संघाने भाजपला काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये तिकीट वाटप, मूळ कार्यकर्ते, हिंदूत्त्व आणि सामाजित समीकरणांसह 6 महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या 6 सूचना महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला वाचवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी भाजपने मायक्रो नियोजन करण्याच्या सूचना संघ परिवारातून देण्यात आल्या आहेत. यासाठी सह सरकार्यवाह अतुल लिमये यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला, संघाचे पदाधिकारी, अमदार आणि इच्छुक उमेदवारही उपस्थित होते.

या बैठकीत सामाजिक समीकरणे जाणून घेत संघाने भाजपचं दुर्लक्ष होत असलेल्या बाबींबाबत सूचना केल्या. यावेळी जातीय समीकरणे जुळवताना हिंदुत्वापासून दूर जाऊ नका असा सल्लाही संघाकडून भाजपला देण्यात आला आहे.

संघाच्या या बैठकीत उमेदवारी देण्याबाबतचा मुद्दाही चर्चेत आला होता. यावेळी संघाकडून भाजपला सूचना करण्यात आल्या की, विधानसभेचे तिकीट देताना, कुणालाही द्या, पण पक्षाला इथपर्यंत आणणाऱ्या मूळ कार्यकर्त्याना दुर्लक्ष करू नका.

यावेळी लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेत अधिक सक्रियपणे कामाला लागण्याच्या सांगण्यात आले.

या बैठकीत पुढे सांगण्यात आले की, समाज माध्यमांवर व्यक्त होत, विरोधक जनतेमध्ये संभ्रम तयार करत असतील तर त्याला पुराव्यांच्या आधारे उत्तरे द्या. यासह ज्या मतदार संघात पक्षाची ताकद आहे तेथील बूथवर मतदानाचा टक्का 60 टक्के पर्यंत वाढवण्याचा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

लोकसभेला भाजपला फटका

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने खासदारांच्या संख्येच्या बाबतीत गेल्या निवडणुकीत पहिले स्थान गमावले होते. तर महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत राज्यात आघाडी मिळवली होती.

दरम्यान लोकसभेतील या निराशाजनक कामगिरीनंतर विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा सक्रियपणे मैदानात उतरला आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT