Sharad Pawar addressing a press conference about the assembly elections strategy with NCP, Congress, and Shiv Sena (UBT). esakal
Maharashtra Election 2024 Result

Sharad Pawar: 1 जागा अन् तिन्ही पक्षांना लढवायची असेल तर..? शरद पवारांनी सांगितली रणनीती, अंतिम उमेदवारांची घोषणा कधी?

Sharad Pawar Announces NCP's Strategy for Upcoming Assembly Elections: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील टिम इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. तीन पक्षांची एकत्रित आघाडी असल्यामुळे जागावाटपासाठी तीनही पक्षांना एकवाक्यता साधावी लागणार आहे.

Sandip Kapde

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी सांगितले की, इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरू असून, जागावाटपाच्या निर्णयानंतरच अंतिम उमेदवारांची घोषणा केली जाईल.

इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरू-

शरद पवार यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहायला मिळते. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी १० ते १५ हितचिंतक येऊन त्याला संधी द्यावी, अशी विनंती करतात. ही प्रक्रिया लोकशाहीमध्ये सामान्य आहे. मात्र, निर्णय एकट्याने न घेता, विविध सहकाऱ्यांची मते विचारात घेतली जातील. परिस्थितीचा सखोल अभ्यास करूनच योग्य उमेदवाराची निवड केली जाईल.

उमेदवार निवड प्रक्रियेचे नियोजन-

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील टिम इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. तीन पक्षांची एकत्रित आघाडी असल्यामुळे जागावाटपासाठी तीनही पक्षांना एकवाक्यता साधावी लागणार आहे. सध्या याबाबतच्या चर्चा सुरू आहेत आणि लवकरच निर्णय घेतला जाईल.

ही निवडणूक तीन पक्ष एकत्र येवून लढवणार आहेत. त्यामुळे कोणती एक जागा असेल आणि ती तिघेपण लढवायची म्हणत असतील तर यावर बसून निर्णय घ्यावा लागेल, ही प्रक्रिया सध्या सुरू आहे.

मुंबईत नेत्यांची बैठक-

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसून जागावाटपाच्या प्रक्रियेवर चर्चा करत आहेत. एकदा जागांचे वाटप निश्चित झाले की, प्रत्येक पक्ष आपले उमेदवार निवडण्यासाठी पुढील पाऊल उचलणार आहे. शरद पवार यांनी स्पष्ट केले की, जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा केली जाईल आणि प्रचार सुरू केला जाईल.

पाच वर्षांपूर्वीच्या निकालांचा आढावा-

पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा एक खासदार निवडून आला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच खासदार निवडले गेले होते. यावेळी, ४८ पैकी ३० जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे, याचा अर्थ लोकांमध्ये मोठा बदल घडला आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT