Vidhan Sabha Election 2024 Esakal
Maharashtra Election 2024 Result

Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या तोंडावर राज्यात नवा पक्ष, मनोज जरांगेंना बरोबर घेत व्यक्त केली एकत्र लढण्याची इच्छा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ‘‘एमआरएस’ चे पाच सप्टेंबरला अधिवेशन होणार आहे. समविचारी मित्र पक्षांना बरोबर घेणार असून पंधरा जणांची कोअर समितीची स्थापना केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड, ता.२० : तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये (बीआरएस) महाराष्ट्रातील अनेकांनी प्रवेश केला होता. आता या नेत्यांनी ‘बीआरएस’ला सोडचिठ्ठी देत नवा ‘महाराष्ट्र राष्ट्र समिती’ (एमआरएस) पक्ष स्थापन करण्याचा ठराव घेतला आहे. या माध्यमातून परिवर्तन आघाडी करून राज्यात तिसरा पर्याय देत विधानसभेची आगामी निवडणूक लढवणार आहोत,’’ अशी माहिती माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

धोंडगे म्हणाले, ‘‘येथील शासकीय विश्रामगृहात आज ‘बीआरएस’ची राज्यस्तरीय बैठक झाली. बैठकीला राज्यातील चारही विभागांतील नेते उपस्थित होते. ‘बीआरएस’ पक्षाने लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याची व निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली होती. आगामी विधानसभा निवडणूकही न लढविण्याचा निर्णय ‘बीआरएस’च्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत ‘महाराष्ट्र राष्ट्र समिती’ हा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने स्थापन केलेला हा पक्ष ‘अब की बार किसान सरकार’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणार आहे.

समविचारी मित्र पक्षांची साथ

‘‘एमआरएस’ चे पाच सप्टेंबरला अधिवेशन होणार आहे. समविचारी मित्र पक्षांना बरोबर घेणार असून पंधरा जणांची कोअर समितीची स्थापना केली आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष यांच्या परिवर्तन आघाडीत ‘एमआरएस’ हा घटक पक्ष असेल. राज्यात तो महाविकास आघाडी व महायुतीला सक्षम पर्याय असणार आहे,’’ अशी माहिती धोंडगे यांनी दिली.

जरांगेंशीची चर्चा करणार

महिनाभरात ‘एमआरएस’ पक्षाची नोंदणी होणार आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ‘बीआरएस’ च्या पराभवामुळे महाराष्ट्रात या पक्षाची कोंडी झाली आहे. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ही कोंडी फोडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह प्रकाश शेंडगे यांच्यासोबतही आघाडीबाबत चर्चा करणार असल्याचे धोंडगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Mumbai Rain Update : मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीवर पावसाचं सावट! हवामान खात्याने दिली महत्त्वाची अपडेट, पहाटेपासून शहरात ढगाळ वातावरण

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Latest Maharashtra News Updates : लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT