Kolhapur North Vidhan Sabha Elections 2024 sakal
Maharashtra Election 2025 Result

Kolhapur North Assembly Elections 2024: `कोल्हापूर उत्तर’ ठाकरे गटाकडे असेल; पूर्वीच काँग्रेससोबत चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट : विनायक राऊत

Kolhapur North Vidhan Sabha Elections 2024: ‘पोटनिवडणुकीवेळी काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार कोल्हापूर उत्तरची जागा ठाकरे शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हाला मिळेल.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: ‘पोटनिवडणुकीवेळी काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार कोल्हापूर उत्तरची जागा ठाकरे शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हाला मिळेल. दिलेला शब्द ते पुरा करतील’, असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला.

राऊत यांनी कोल्हापूर उत्तरसह, राधानगरी, शिरोळ, शाहूवाडी, हातकणंगलेचीही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, अशी मागणी असल्याचे पत्रकारांच्या प्रश्‍नावर स्पष्ट केले. मिरजकर तिकटी येथे २५ फुटी मशाल प्रतिकृतीचे अनावरण झाल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार विजयी झाले आहेत.

त्यावेळी ठाकरे गटाची मोठी ताकद त्‍यांच्या पाठीशी होती. तेव्हा काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार यावेळी कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल, असा शब्द दिला आहे. तो शब्द ते पुरा करतील, याची मला शंभर टक्के खात्री आहे. लोकसभेलाही शिवसेनेची जागा काँग्रेसला दिली आहे. आता राधानगरी, कोल्हापूर उत्तर, शिरोळ, शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचा हक्क आहे.

उमेदवार विजयी होतील, असे उमेदवार आमच्याकडे हातकणंगले, चंदगडमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे त्याही जागा आम्हाला मिळाव्यात, अशीही आमची मागणी राहणार आहे.’ यावेळी व्यासपीठावरील माजी आमदार उल्हास पाटील यांचा उल्लेख ‘माजी आणि पुढे होणारे आमदार’ असा करून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले.

सरकारला जनता धडा शिकवेल

विशाळगड दंगलीतील गुन्हेगार पोलिसांना सापडत नाहीत, पण ते सिद्धगिरी मठावर होते, या प्रश्‍नावर राऊत म्हणाले, ‘बलात्काऱ्यांना, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. बेईमानी, गद्दार आणि भ्रष्टाचारी सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांना जनता धडा शिकवेल.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीवरुन परतताना भीषण अपघात! ५० विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेत ४ मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

अभिनेत्रीच्या पर्सनल मेकअप रुममध्ये साडी बदलली म्हणून दिवसभर झाडाखाली बसवलं; वर्षा दांदळे यांनी सांगितला हिंदीतला अनुभव

Mangalwedha News: जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील ऊसदराचा तोडगा कारखानदारांना अमान्य; मंगळवेढ्यात युटोपियन कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर अंबड ठाण्यात; पेन ड्राईव्हमध्ये दिले पुरावे

बाबो! सैफ अली खानने करीनाच्या एक्स बॉयफ्रेंडला मारली मिठी; व्हिडीओ पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT