Raju Shetti Belgaum esakal
Maharashtra Election 2025 Result

Raju Shetti : 'महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्रपणे लढविणार'; बेळगावात राजू शेट्टींची मोठी घोषणा

Raju Shetti Belgaum : महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे धोरण एकच आहे.

सकाळ डिजिटल टीम

आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहे.

बेळगाव : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) कोणत्याही राजकीय पक्षाशी हातमिळवणी करणार नाही, तर स्वतंत्रपणे सर्व जागांवर निवडणूक लढविणार आहे. याबाबत नियोजन सुरू असून लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगितले.

ऊस गाळप हंगाम (Sugarcane Season) सुरू करण्यापूर्वी उसाचा भाव जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी संघटनांकडून सोमवारी (ता. १४) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. #ElectionWithSakal

महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे धोरण एकच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहे. यासाठी ‘परिवर्तन महाशक्ती’च्या नावाखाली राज्यातील छोटे पक्ष एकत्रित करून संघटना बळकट करण्यात येणार आहे.

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असणाऱ्या नेत्याची हत्या केली जात असेल तर सर्वसामान्यांचे रक्षण हे सरकार काय करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : मोदींचा मोठा संकल्प; स्वावलंबी भारतासाठी देशाला दिला खास संदेश

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT