Saam Marathi's Exit Poll

 

esakal

Election News

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

Saam Marathi's Exit Poll Accuracy : जाणून घ्या, साम मराठीच्या एग्झिट पोलमध्ये मुंबई महापालिकेच्या निकालाबाबत नेमकी काय आकडेवारी दर्शवली गेली होती?

Mayur Ratnaparkhe

Saam Marathi exit poll accurately predicted BMC election results : महाराष्ट्रातील २९ महापालिकांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये भाजपने सर्वाधिक ठिकाणी विजय मिळवत राज्यात अव्वल क्रमांकांचा पक्ष असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे मुंबईतही भाजप-शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली आहे. तर जवळपास २५ महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीचा महापौर बसणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना म्हटले आहे.

खरंतर आजच्या निकालाआधी विविध मतदान झाल्याच्या दिवशी संध्याकाळीच अनेक एग्झिट पोल समोर आले होते. जवळपास प्रत्येकानेच भाजप महायुतीला महापालिका निवडणुकांमध्ये यश मिळेल आणि मुंबईतही भाजप-शिवसेना महायुतीचा विजय होईल असं दर्शवले होतं. मात्र प्रत्येक एग्झिट पोलने दर्शवलेली आकडेवारी आणि आजच्या निकालात समोर आलेली आकडेवारीत तफावत आढळून आली आहे. परंतु केवळ एकमेव साम मराठीने मुंबई महापालिकेसाठी दाखवलेला एग्झिट पोल हा आजच्या निकालानंतर जवळपास तंतोत सारखाच उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

साम मराठीने मुंबई महापालिकेसाठी दाखवलेल्या एग्झिट पोलमध्ये, भाजप – ८४, शिवसेना – ३५, राष्ट्रवादी काँग्रेस -०३, इतर -०५, काँग्रेस – २३, ठाकरे गट – ६५, पवार गट -०२, मनसे -१० अशी आकडेवारी दाखवली होती.

Saam Marathi exit poll

यानंतर आज जेव्हा निकाल लागले आहेत, तेव्हा यामध्ये भाजप – ८८, शिवसेना -२९, राष्ट्रवादी काँग्रेस -०३, इतर- ११, ठाकरे गट – ६५, मनसे – ०६, काँग्रेस – २४, वंचित -०० अशी आकडेवारी समोर आली आहे. याचाच अर्थ साम मराठीचा एग्झिट पोल हा तंतोतंत खरा ठरला आहे.

याशिवाय साम मराठीच्या एग्झिटपोलनुसार मुंबईत महायुती-११९, ठाकरे बंधू – ७५ काँग्रेस आघाडी-२५ आणि इतर-०३ अशा जागा जिंकतील असे दर्शवले गेले होते.  यानंतर आज जेव्हा प्रत्यक्ष निकाल समोर आला तेव्हा समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत महायुती-११७, ठाकरे गट–७१, काँग्रेस आघाडी-२४, इतर-१४ जागांवर विजयी झाली असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT