Karnataka Election bjp announce candidate list on april 8 pralhad joshi politics sakal
Assembly Election

Karnataka Election : भाजपची उमेदवारी यादी ८ एप्रिलला; प्रल्हाद जोशी

मंत्री प्रल्हाद जोशी; कोअर कमिटी बैठकीनंतर माहिती

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी (ता.४) दुसरी यादी जाहीर करण्याची तयारी सुरू असताना भाजपची पहिली यादी येत्या ८ एप्रिलला घोषित केली जाईल, अशी माहिती केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

भाजपची जिल्हास्तरीय कोअर कमिटी बैठक रविवारी (ता.२) रात्री उशिरा झाली. बेळगाव शहर, ग्रामीण व चिक्कोडी विभागातील पदाधिकारी व कोअर कमिटीचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर मंत्री जोशी बोलत होते. भाजपचे उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणासह माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार रमेश जारकीहोळी, आमदार, खासदार उपस्थित होते.

श्री. जोशी म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये तिघांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा कौल घेण्यात येत आहे. इच्छुक तिघांची यादी ही राज्य निवडणूक समितीकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर अंतिम उमेदवारी ठरविण्यात येईल. पक्षाला १८ पैकी १५ जागांवर विजयाचे उद्दिष्ट आहे.’

दरम्यान, काँग्रेसकडून पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली असून, २२४ पैकी १२४ उमेदवारांचा समावेश आहे. त्यात जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश आहे. मात्र, जिल्ह्यामधील अन्य नऊ उमेदवारांसोबत राज्यातील १०० जणांची नावे घोषित व्हायची आहेत.

त्यासाठी मंगळवार व बुधवाराचा मुहूर्त निश्‍चित असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे भाजप मतदारांचा कौल घेत आहे. जनमत आधारे उमेदवार निश्‍चित करत आहे. त्यानुसार येत्या ८ एप्रिलला उमेदवारांची पहिली यादी घोषित केली जाईल, अशी माहिती जोशी यांनी दिली आहे.

पक्षात मतभेद नाहीत

उमेदवार निवडीसाठी पुढील दोन दिवस बैठक झाली. बेळगाव व बंगळूर हे जिल्हे सर्वाधिक मतदारसंघ असलेले आहेत. यामुळे माहिती गोळा केली जात आहे. तसेच जिल्हा भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आगामी निवडणूक एकसंघपणे लढवणार असल्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : महायुतीचा 'नारळ' फुटला! मुख्यमंत्र्यांची त्र्यंबकेश्वरमधून प्रचाराची सुरुवात, उपमुख्यमंत्र्यांची नांदगावला सभा

Mumbai High Court : भाक्षी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका! १५ दिवसांत कारवाईचे निर्देश

Truck Accident: भरधाव ट्रकने मागून दिलेल्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू; गोंदिया येथील घटना

माजी खासदार संजय पाटलांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी आघाडीला 'वंचित'चा पाठिंबा; सुजात आंबेडकर म्हणाले, दादागिरीच्या प्रभावातून...

Smriti Mandhana : बाबांनंतर पलाशही रुग्णालयात, लग्न पुढे ढकललं; स्मृतीने लग्नाआधीचे रिल्स अन् पोस्ट हटवल्या, कारण काय?

SCROLL FOR NEXT