Harish Rawat Replied Amit Shah Google
Assembly Election

'मी उत्तराखंडचा चौकीदार, वेळ आल्यास भूंकणार अन्...', रावत शहांवर कडाडले

सकाळ डिजिटल टीम

अमित शाह यांच्या वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत (Harish Rawat) यांनी पलटवार केला असून, शाह यांनी त्यांना कुत्रा म्हटले तरी ते त्यांच्यासाठी आदरणीय आहेत, असे म्हटले आहे. यासोबतच रावत यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री योगी (CM Yogi Adityanath) यांचेही त्यांच्या वक्तव्याबद्दल आभार मानले आहेत.

एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत हरीश रावत यांना अमित शहांच्या 'धोबी'वरून केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ''गृहमंत्री त्यांची संस्कृती दाखवत आहेत. शहा यांनी ''धोबी का...'' म्हटलं. पुढे कुत्रा म्हटल नाही. त्यांनी कुत्रा म्हटलं असतं तरी ते स्वतःची संस्कृती यातून दाखवून देतात. आमची संस्कृती ही नाही. माझ्यासाठी पंतप्राधन मोदी आणि अमित शाह दोघेही आदरणीय आहेत.''

अमित शाह जर कुत्रा म्हणत असतील तर हा कुत्रा उत्तराखंडचा चौकीदार आहे. उत्तराखंडच्या जनतेवर काही वार झाला तर तो सिंहासारखा कधी तुमच्यावर वार करेल सांगता येत नाही. मी भूंकेन आणि वेळ आली तर चावणार सुद्धा, असा थेट इशारा हरिश रावत यांनी अमित शाह यांना दिला आहे. इथं येणारे भाजपचे प्रत्येक नेते हरिश रावत यांच्या दोन-चार टीका करतात. यामध्ये गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान मोदी, शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. पण, मी लोकशाहीचा पाईक आहे. त्यामुळे या प्रत्येकाचे आभार मानतो, असंही रावत म्हणाले.

एका निवडणूक रॅलीत गृहमंत्री अमित शाह यांनी हरीश रावत यांच्यावर निशाणा साधला होता. ''धोबी का...ना घर का, ना घाट का?'' असं अमित शाह म्हणाले होते. त्यानंतर उत्तराखंडचे राजकारण तापले असून काँग्रेस नेते अमित शाह यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT