BJP Sakal
Assembly Election

उत्तराखंड : ‘मोदी फॅक्टर’वरच भाजपची मदार

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मोदी फॅक्टरकडून भाजपला मोठ्या आशा आहेत. २०१७ च्या निवडणुकीत मोदी फॅक्टरने भाजपला यश मिळवून दिले होते.

संदीप काळे

उत्तरकाशी - उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly Election) मोदी फॅक्टरकडून (Modi Factor) भाजपला (BJP) मोठ्या आशा आहेत. २०१७ च्या निवडणुकीत मोदी फॅक्टरने भाजपला यश मिळवून दिले होते. उत्तराखंडमध्ये थंडीने गेल्या २४ वर्षांचा विक्रम मोडला आहे. नैनितालच्या उंच भागात दीड फूट, तर मुक्तेश्वरमध्ये अडीच ते तीन फूट हिमवृष्टी झाली, त्यामुळे त्याचा प्रचार, मतदानावर थेट परिणाम होणार.

भाजपने २०१७ मध्ये राज्यातील ७० विधानसभेच्या ५७ जागा जिंकल्या होत्या, यावेळी सुद्धा निवडणुकीत प्रचाराच्या मध्यावर पक्षाने ‘मोदी फॅक्टर’वर प्रचाराची मोहीम तीव्र केली आहे.

राज्यात २०१७ सारखी मोदी लाट नाही, असे खुद्द भाजपचे नेतेही मानतात, पण मोदींच्या पसंतीस उतरण्यासाठी भाजपने राज्यात आपली रणनीती बदलली आहे. या अंतर्गत भाजपने आता ‘उत्तराखंड की पुकार, मोदी-धामी सरकार’ अशा घोषणा देत सर्व विधानसभांमध्ये प्रचाराची मोहीम तीव्र केली आहे. लोकांमध्ये मोदींना बळ देण्याचा संदेश कसा द्यायचा आहे, हेही उमेदवार आणि कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात आले आहे. जनतेला मात्र आता बदल हवा आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस आणि इतर पक्षांनी वेगळी रणनीती आखली आहे.

थंडीच्या कडाक्याने नेत्यांना धडकी..

उत्तराखंडमध्ये १४ फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद लावली आहे. पाऊस आणि हिमवृष्टीच्या कठीण वातावरणातही राजकीय पक्षांचा प्रचार जोरदार सुरू आहे. हवामानामुळे निवडणुकीचा प्रचार विस्कळित झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या रॅलीसह अनेक राजकीय कार्यक्रम रद्द झाल्याची बाब समोर आली आहे. गढवाल प्रदेशातील उत्तरकाशी, टिहरी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यातील उंचावरील गावे बर्फाने झाकली गेली आहेत. गंगोत्री विधानसभेची दहा गावे, यमुनोत्री विधानसभेची पाच आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील १५ गावे बर्फाच्या कुशीत आहेत. अनेक रस्ते बंद असल्याने प्रचारात अडथळे निर्माण होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड

Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जनसंपर्क, भ्रमंती आणि संस्कृतीचे दर्शन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT