pm narndra modi
pm narndra modi  Esakal
Election News

दहा मार्चला यूपीत विजयासह पहिली होळी साजरी करणार-नरेंद्र मोदी

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक हरणारी कुटुंबे आता जातीच्या नावावर विष पसरवतील. हे लोक असे आहेत जे खुर्चीसाठी कुटुंबासोबत लढतील असा निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काॅंग्रेसला (Congress) लगावला. १० मार्चला भाजपच्या बंपर विजयासह पहिली होळी साजरी केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज ते उत्तर प्रदेशातील UP Election 2022) हरदोई (Hardoi) येथे प्रचारा दरम्यान बोलत होते.

निवडणूक हरणारी कुटुंबे आता जातीच्या नावावर विष पसरवतील. हे लोक असे आहेत जे खुर्चीसाठी कुटुंबासोबत लढतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेस कुटुंबावर घणाघात केला. यावेळी ते जनतेला संबोधताना म्हणाले, उत्तर प्रदेशचा विकास हा देशाचा विकास. सत्तेसाठी हे कुटुंब कोणत्याही थराला जाऊ शकते. हे लोक कोणत्याही जाती किंवा समाजाचे असू शकत नाहीत असे टीकास्त्र मोंदीनी सोडले.

उत्तर प्रदेशात तुम्ही ज्या दुहेरी इंजिन सरकारला आशीर्वाद देऊन निवडून आणलात ते सरकार कोणत्याही कुटुंबाचे नाही. दिल्लीतील भारत सरकार हे कोणत्याही एका कुटुंबाचे सरकार नाही. असा टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले, १० मार्चला भाजपच्या बंपर विजयासह पहिली होळी साजरी केली जाईल. हे करायचे असेल तर मतदान केंद्रांवर तयारी करावी लागेल असे आवाहन जनतेला मोंदीनी केले.

उत्तर प्रदेशमध्ये ५ वर्षांपूर्वी माफियांनी काय अवस्था केली हे आठवतय का? याठिकाणी व्यापारी धंदा करायला घाबरत होते. विरोधकांनी कट्टा आणि सत्तेला मोकळीक दिली होती हे हरदोईच्या जनतेने पाहिले आहे असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

SCROLL FOR NEXT