Pushkar Singh Dhami esakal
Election News

सत्ता मिळाल्यानंतर समान नागरी कायदा लागू करणार : पुष्कर धामी

सकाळ डिजिटल टीम

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालंय.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Manipur Assembly Election) भाजपला (BJP) चांगलं यश मिळालंय. पाचपैकी चार राज्यात भाजपला बहुमत मिळालंय. यातील मणिपूरमध्ये (Manipur) भाजपनं सरकार स्थापन केलंय. दरम्यान, आज पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) हे दुसऱ्यांदा उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शपथ घेण्यापूर्वीच पुष्कर सिंह धामी यांनी आश्वासन दिलंय की, मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर, 'समान नागरी कायद्यासह भाजपनं निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करू, असं म्हंटलंय.

राज्यात पारदर्शक सरकार चालवणार असून निवडणुकीपूर्वी भाजपनं जी काही आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली जातील, असंही आश्वासन धामी यांनी दिलंय. समान नागरी कायदा (Uniform Civil Code) देखील यापैकी एक आहे. निवडणुकीपूर्वी धामी यांनी त्यांच्या सभांमध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेखही केला होता. कायदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असून त्यात कायदेतज्ज्ञ, ज्येष्ठ नागरिक आणि विचारवंत यांचा समावेश असेल, असं धामींनी सांगितलं होतं. समान नागरी कायदा म्हणजेच, भारतात राहणार्‍या प्रत्येक नागरिकासाठी, धर्म किंवा जातीचा विचार न करता समान कायदा असेल. समान नागरी कायद्यात विवाह, घटस्फोट आणि मालमत्तेचं विभाजन याबाबत सर्व धर्मांसाठी समान कायदा लागू असणार आहे, असंही ते म्हणाले होते.

आज पुष्कर सिंह धामींच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील उपस्थित राहणार आहेत. यासोबतच भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही यात सहभागी होणार आहेत. पुष्कर सिंह धामी हे 12 वे मुख्यमंत्री म्हणून दुपारी 2.30 वाजता देहराडूनच्या परेड ग्राउंडवर शपथ घेतील. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT